Breaking News

भर दिवसा रस्त्यावर आला वाघ

भर दिवसा रस्त्यावर आला वाघ

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील साकरीटाेला-रामपूर-अंजोरा मार्गावर शुक्रवार २० जून रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास एक वाघ आढळला.

 

पाच ते दहा मिनिटे या मार्गावर या वाघाचा मुक्त वावर होता. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर या वाघाने रस्त्यालगत असलेल्या कालव्याकडे धाव घेतली. गावकऱ्यांची लगेच याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.

 

सालेकसा तालुक्यातील साकरीटाेला-अंजोरा परिसरात गेल्या आठ दिवसांपासून वाघाचा वावर असल्याची चर्चा होती. या वाघाने वळद येथील तीन ते चार जनावरांची शिकार केली होती. यामुळे या परिसरातील पशुपालक व गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण होते. सध्या खरीप हंगामातील शेतीची कामे सुरू असल्याने शेतकरी बांधव सायंकाळी उशिरापर्यंत शेतावरच असतात.

 

शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास साकरीटोला-रामपूर-अंजोरा मार्गावर पट्टेदार वाघ रस्ता पार करीत असताना काही गावकऱ्यांना आढळला. भर दुपारी वाघाचा रस्त्यावर मुक्त वावर पाहून या मार्गावरून ये-जा करणारे नागरिक व गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. गावकऱ्यांनी लगेच याची माहिती लगेच आमगाव, अंजाेरा येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.

 

माहिती मिळताच वन विभागाचे आमगाव, देवरी, सालेकसा येथील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, तर वाघाला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी आमगाव व सालेकसा पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

 

आमगाव तालुक्यातील कवडी परिसरातील काही तरुणांना हा वाघ शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आढळला. यानंतर त्यांनी या वाघाला साखरीटोलाच्या दिशेने पिटाळून लावले. यानंतर हा वाघसाकरीटोला-रामपूर-अंजोरा मार्गाकडे आल्याची माहिती आहे.

 

रेस्क्यू टीमने केले वाघाला जेरबंद

या वाघाने रामपुरी-पानगाव येथील दिनेश हरिणखेेडे या शेतकऱ्याच्या शेतात ठाण मांडले होते. वाघाला रेस्क्यू करण्यासाठी गोंदिया येथील वन विभागाची रेस्क्यू टीम बोलाविण्यात आली होती. ही टीम दुपारी ३:३० वाजता दाखल झाली. वाघाला बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देऊन दुपारी ४:३० वाजता रेस्क्यू करण्यात आले. रेस्क्यू टीमने वाघाला जेरबंद केल्यानंतर गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला.

About विश्व भारत

Check Also

विदर्भात पावसामुळे सतर्कतेचा इशारा

हवामान विभागाने एकीकडे राज्यात पावसाला ‘ब्रेक’ लागणार असे सांगितले असले तरीही दुसरीकडे विदर्भात मात्र सतर्कतेचा …

कांद्या सडला : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका हा कांद्याचे कोठार समजला जातो. पण, हे कोठार आता अवकाळी पावसाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *