सध्याच्या परिस्थितीत सुपर पॉवर अमेरिका जगातील अनेक देशांशी आपली स्वार्थी चाल खेळुन दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.अमेरिका जरी सुपर पॉवर असला तरी तो दगाबाज आणि धोकेबाज देश आहे ही बाब जगातील प्रत्येक देशाला चांगल्या प्रकारे ग्यात आहे. सर्वप्रथम भारता विरुद्ध टेरिफ वाढवुन भारताचा विश्वासघात केला. भारताने अमेरिकेची टेरिफ चाल पहाता आपण आपला मित्र देश रशिया जास्त जवळीक केली.त्याचबरोबर अमेरिकेला अलगथलग करण्यासाठी व त्याची अरेरावी कमी करण्यासाठी रशियाचा मित्र चीन आणि भारताचा कट्टर शत्रू यांची रशियाच्या सहाय्याने जवळीक वाढली आणि अमेरिकेला जशास तसे उत्तर देण्यासाठी म्हणून भारत,रशिया आणि चीन एकत्र येऊन याचा व्यापारीक करार मोठ्या प्रमाणात करण्यात आला.या तिन देशांच्या जवळीकला दोन ते तीन महिने होताच अमेरिकेने भारतावरील प्रेम वाढविले आणि टेरिफ कमी करण्याची घोषणा करत अनेक व्यापारीक करार झाले.परंतु हे संपूर्ण करार रशिया,चीन आणि भारत यांच्यात व्दीधा निर्माण करून अमेरिकेने भारताला पुन्हा जवळ केले यावरून भारताने अमेरिके पासून सावध रहाण्याची गरज आहे.अमेरिकेने अफगाणिस्तान, युक्रेन इत्यादी अनेक देशांना रक्ताच्या लाथोळ्यात सोडून पसार झाला अशा प्रकारे जगातील अनेक देशांना आपल्या वर्चस्वासाठी आणि स्वार्थासाठी धोका दिला आहे.त्याच पध्दतीने अमेरिका भारतासोबत व्यापार व्यवहार करू शकतो याला नाकारता येत नाही.कारण अमेरिका कधीच कोणाचाच झाला नाही आणि होणार नाही.तो फक्त आपले व्यापारीक स्वार्थ शोधत असतो व त्याच्या सोबतच दोस्तीचा हात समोर करतो.परंतु त्या देशाला ब्लॅकमेल करून केव्हाही धोका सुद्धा देऊ शकतो.अमेरिकेने भारतासोबत व्यापार करार तर केलेत यातही त्याची अरेरावी दिसून येते.अमेरिका म्हणतो की, भारताने आमच्या कडून कापूस आयात केला तर टेक्सटाइलवर झिरो टेरिफ लागेल.परंतु भारताने जर अमेरिकेतून कापूस आयात केला तर भारतीय शेतकऱ्यांच्या कापसाला कवडीमोलाचे भाव येतील हेही तितकेच सत्य आहे. यावरून स्पष्ट होते की अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतीय शेतकऱ्यांची कंबर तोडण्याच्या प्रयत्न करीत आहे. भारतात शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत.अजुनही भारतातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही.याकरीता अनेकदा आंदोलने होतांना आपण पहाले आणि आताही आंदोलने होत आहेत. परंतु कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांना अजुन पर्यंत योग्य न्याय मिळालेला नाही ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.विदेश निती टीकवुन ठेवण्यासाठी भारताचा अमेरिके सोबतचा करार योग्य आहे. परंतु भारताने हेही लक्षात ठेवले पाहिजे की पाकिस्तान,चीन पेक्षा जास्त दगाबाज अमेरिका सुद्धा आहे ही बाब संपूर्ण जग जाणतो.अमेरिकेच्या लक्षात आले की भारत,रशिया, चीन एकत्र आले तर आपली खैर नाही.त्यामुळेच अमेरिकेने टॅरिफ डाव खेळल्याचे स्पष्ट होते.भारत सरकारला हे लक्षात का येत नाही की, भारतात शेतकरी आत्महत्या का करतात.आजही भारतातील शेतकऱ्यांच्या समस्या व आत्महत्या थांबलेल्या नाहीत अशा परिस्थितीत अमेरिकेतील वस्तू जर भारतात कमी भावात मिळाली तर शेतकऱ्यांच्या मालाच्या भावाचे काय? असे अनेक प्रश्न आज शेतकऱ्यांपुढे उपस्थित होत आहे. भारताने अमेरिकेशी व्यापार करार करतांना हेही लक्षात ठेवले पाहिजे की,भारतातील महागाई, वाढत्या आधुनिकीकरणामुळे वाढती बेरोजगारी, ईपीएस – ९५ पेंशन धारकांचा प्रश्न, वाढते कुपोषण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या संपूर्ण गंभीर समस्यांचे मुख्य कारण देशातील वाढती महागाई आहे.भारत सरकार देशातील महागाईकडे दुर्लक्ष करून अमेरिकेसोबत वाटेल ते करार करून देशात महागाईचा डोंगर उभा होत आहे यावर सुद्धा सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.देशाचा विकास झपाट्याने होत आहे यात दुमत नाही.परंतु बेरोजगारीचा मोठा कळस उभा होत आहे या संपूर्ण गोष्टींकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.कारण देशाच्या विकासासोबत मुलभूत सुविधांकडे सुध्दा लक्ष देण्याची गरज आहे.याकडे दुर्लक्ष झाले तर गरीब व सर्वसामान्यांचे हाल बेहाल होतील. कारण देशात अनेक सरकारे आलीत आणि गेलीत परंतु एकाही सरकारने महागाईवर ठोस तोडगा काढलाच नाही. याचा परिणाम आजही देशातील ८० टक्के जनता महागाईच्या रूपात भोगत आहेत.देशातील महागाई कमी झाली तर सर्वच समस्या आपोआप कमी होईल.जय हिंद.
भारताचा अमेरिकेशी करार योग्य : पण…!भारतातील समस्यांचं काय?
Advertisements
Advertisements
Advertisements
विश्वभारत News Website