Breaking News

महाराष्ट्र, गुजरातसह ७ राज्यातील रेल्वे रद्द

Advertisements

जर तुम्ही जून महिन्यात कुठे बाहेर फिरण्याचा किंवा प्रवासाचा बेत आखत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बिलासपूर रेल्वे मंडळाच्या चांपा स्थानकावर चौथ्या रेल्वे लाईनचे काम सुरू असल्याने रेल्वे प्रशासनाने जून २०२६ मध्ये तब्बल ७७ गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ६५ एक्सप्रेस आणि १२ पॅसेंजर ट्रेनचा समावेश असून, यामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगालसह ७ राज्यांतील प्रवाशांचे हाल होणार आहेत.

Advertisements

६५ एक्सप्रेस आणि १२ पॅसेंजर ट्रेन रद्द

Advertisements

रेल्वेने जाहीर केलेल्या नवीन पत्रकानुसार, जून महिन्यात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात असली तरी महत्त्वाच्या ७७ गाड्या पूर्णपणे रद्द राहतील. याशिवाय ६ ट्रेन त्यांच्या नियोजित स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच (शॉर्ट टर्मिनेट) थांबवल्या जातील, तर ५ गाड्या त्यांच्या ठरलेल्या वेळेपेक्षा उशिराने धावतील. ऐन सुट्ट्यांच्या हंगामात रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे हजारो प्रवाशांचे आरक्षण रद्द होणार असून त्यांना मोठा आर्थिक व मानसिक फटका बसणार आहे.

रद्द झालेल्या प्रमुख गाड्यांची यादी

प्रवाशांच्या माहितीसाठी रद्द करण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या पुढीलप्रमाणे आहेत:

हावडा – सीएसएमटी एक्सप्रेस (१२८७०): १२ जून

सीएसएमटी – हावडा एक्सप्रेस (१२८६९): १४ जून

हटिया – पुणे एक्सप्रेस (२२८४६): १२ ते १५ जून

पुणे – हटिया एक्सप्रेस (२२८४५): १४ ते १७ जून

अहमदाबाद – हावडा एक्सप्रेस (१२८३३/१२८३४): ११ ते १५ जून

गया – एलटीटी एक्सप्रेस (२२३५८): १० जून

एलटीटी – गया एक्सप्रेस (२२३५७): १२ जून

टाटानगर – इतवारी – टाटानगर एक्सप्रेस (१८१०९/१८११०): ८ ते १९ जून

आठ महत्त्वाच्या गाड्यांचे मार्ग बदलले

या मेगाब्लॉकमुळे रेल्वेने अनेक गाड्या रद्द न करता त्यांचे मार्ग वळवले आहेत. यामध्ये दुरंतो आणि ज्ञानेश्वरी एक्सप्रेससारख्या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे.

हावडा – पुणे दुरंतो (१२२२२) व पुणे – हावडा दुरंतो (१२२२१): या गाड्या अनुक्रमे ११, १३ आणि १५ जून रोजी रायपूर, टिटलागड आणि झारसुगुडा मार्गे धावतील.

सीएसएमटी – हावडा दुरंतो (१२२६१) व हावडा – सीएसएमटी दुरंतो (१२२६२): ११ ते १५ जून दरम्यान या गाड्या देखील झारसुगुडा, टिटलागड आणि रायपूर मार्गे चालवल्या जातील.

एलटीटी – शालीमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेस (१२१०१/१२१०२): १२ ते १५ जून दरम्यान ही गाडी रायपूर-टिटलागड मार्गे वळवण्यात आली आहे.

प्रवाशांना रेल्वे प्रशासनाचे आवाहन

चांपा स्थानकातील या चौथ्या लाईनच्या विकासकामामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रवाशांनी घरातून निघण्यापूर्वी किंवा स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे लाईव्ह स्टेटस आणि वेळेची अचूक माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा हेल्पलाईनवरून तपासून घ्यावी, जेणेकरून ऐनवेळी होणारी धावपळ आणि मनस्ताप टाळता येईल.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कोयले से बनेगा LPG, पेट्रोल-डीजल? प्रॉसेस से रसोई और वाहनों को फायदा

कोयले से बनेगा LPG, पेट्रोल-डीजल? प्रॉसेस से रसोई और वाहनों फायदा टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

नागपुरात पेट्रोल १०७ रुपये लिटर : डिझेलही वाढले

सामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. गेल्या काही काळापासून स्थिर असलेल्या इंधन दरांमध्ये आता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *