वर्धा दि.18 : कोरोना कोवीड 19 च्या प्रादूर्भावामूळे अनेकजण बेरोजगार झालेत. पण आता अनेक कारखाने, कंपन्यात कामगारांची चणचण भासू लागली आहे. नोकरी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असल्यामुळे बेरोजगेारांच्या हाताला काम मिळणार आहे. यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्धा यांचे माध्यमातून ऑनलाईन रोजगार मेळावा 21, 22 व 23 सप्टेंबरला ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. इच्छक उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंद करावी.
सद्य:स्थितीत लॉकडाऊनमुळे स्वगावी परत आलेल्या नोकर, कामगार, मजूर वर्गाचा रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्धा तर्फे खासगी क्षेत्रातील नामांकित उद्योजक, कंपनी यांच्याकडील अनेक पदे भरण्यासाठी पात्र व इच्छूक पूरुष व स्त्री उमेदवारांच्या ऑनलाईन पध्दतीने मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. सदर मेळाव्यामध्ये एमडिएसएसजी मार्केटिंग कंपनी, वर्धा, धुत ट्रांस्मीशन कंपनी औरंगाबाद, एसएसएम फार्मूलेशन कंपनी हिंगणघाट, जय भवानी फॉर्माकिंग वर्धा, पीएनबी लाईफ इंश्यूरंस कंपनी नागपूर, निर्मल गृह उद्योग वर्धा, भारती हाईजिंग वर्धा, गिमाटेक्स हिंगणघाट व वणी, इंडोरामा सिंत्थेटिक्स कंपनी बुटीबोरी, नवकिसान बायोटेक कंपनी नागपूर, युरेका फोरबस कंपनी नागपूर, नॉलेज अकॅडमी वर्धा, भारती बिजनेस कंसलटंसी वर्धा तसेच बी. जी. लाईन ईलेक्ट्रीकल्स कंपनी औरगाबाद अश्या एकुण 16 कंपन्या या ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग होणार आहेत. दहावी ते पदवी, आयटीआय, पदविका, पास – नापास उमेदवारांकरीता एकुण 1713 रिक्तपदे आहेत. पैकी 1163 पूरुष व 550 महिलांकरीता पदे आहेत.
या ऑनलाईन मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवार 21,22 व 23 सप्टेंबर रोजी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करु शकतात. त्यानंतर उद्योजक अर्ज केलेल्या उमेदवारांची छाननी मुलाखती, निवड याबद्दल उमेदवारांस वेळोवेळी कळविण्यात येूईल. उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जॉबसिकर रजिस्ट्रेशन एंम्पलायमेंट कार्ड, तयार करुन आपल्या प्रोफाई मध्ये आधार कार्ड क्रमांक तसेच शैक्षणिक पात्रतेची नोंद करणे अनिवार्य आहे. तसेच वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रतेचा तपशिल मोबाईल, ईमेल, पत्ता अद्ययावत करावा, असे आवाहन ज्ञा. मा. गोस्वामी, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद, वर्धा यांनी केले आहे.