वर्धा प्रतिनिधी :- कोरोणा काळात स्वताच्या कुटुंबाची पर्वा नकरता योध्दा म्हणून काम करणाऱ्या आश गट प्रवर्तक यांना वेठबिगारीची वागणूक शासन प्रशासन देत असून आपल्या हक्कासाठी *आशा गट प्रवर्तकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन प्रशासना कडे वारंवार विनंती केल्या परंतु शासन प्रशासन योग्य न्याय देत नसल्यामुळे नाईलाजाने शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असे मत गटप्रवर्तक अध्यक्ष शबाना शेख आशा वर्कर अध्यक्ष ज्योषना राउत यांनी सांगितले*
आयटक संलग्न आशा गट प्रवर्तक संघटना जिल्हा शाखा वर्धा चे वतिने आशा व गट प्रवर्तक यांना कोवीड १९ सर्वेक्षण दररोज ३००/- रुपये मोबदला व इतर प्रलंबीत मागण्या करीता जिल्ह्यातील आशा गट प्रवर्तक १४ सप्टेंबर पासून असहकार आंदोलन सुरु केले आहे.
*त्यामुळे संपूर्ण कामबंद न करता फक्त निर्णय होई पर्यत कोरोणा अंतर्गत आयएलआय व सारी लक्षणे सर्वेक्षण व माझा कुटुंब -माझी जबाबदारी सर्वेक्षण करण्यात येणार नाही* माञ नियमित असलेले काम करण्याचा निर्णय घेण्यात आला असे आशा प्रतिभा वाघमारे व विना पाटील यांनी सांगितले कुणीही काम करण्यासाठी दडपण आनु नये अशाही इशारा देण्यात आला
*बहिष्कार करण्याची पुर्व सुचना मा.जिल्हाधिकारी. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी.जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच देवळी समुद्रपूर सेलू हिंगणघाट आर्वी वर्धा येथे देण्यात आले*
*प्रशासनाने योग्य दखल घेतली नाहीतर २३ सप्टेंबर रोजी जिल्हाभर निदर्शने करतील*
सांगली जिल्हा प्रशासन १४ वित्त आयोगातून दरमहा १०००/- रुपये देते.मग वर्ध्यात का नाही ? असा सवाल करण्यात येत आहे.
शासन व प्रशासन आशा गट प्रवर्तकांना वेठबिगारीची वागणूक देत असल्याचा आरोप राज्य सचिव सुजाता भगत यांनी व्यक्त केला *त्यापुढे म्हणाल्या सर्वांनाच माहित आहे कोरोणा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशाची भुमीका काय आहे? फक्त शासन प्रशासन खोटी प्रसंशा करते यांनी पोट भरत नाही,वर्धा जिल्ह्यात १०३३ आशा वर्कर व ५४ गट प्रवर्तक आपल्या कुटुंबाची पर्वा नकरता कोरोणा योध्दा म्हणून काम करतात . जनतेच्या शिव्याचा मार सहन करतात .जेव्हा आपल्या अडचणी अधिकाऱ्यांना सांगतात तेव्हा एकही अधिकारी मदत करीत नाही आता तर एकादा व्यक्तीची चाचणी पाँजेव्हीट निघाली तर दोषी आशांनाच धरुन अश्लील भाषेत बोलतात* *शासनाने ३१ मार्च रोजी परिपञक काढून कोवीड १९ मध्ये काम करणाऱ्या कार्यकत्यांना पोत्साहन भत्ता मानधना व्यतिरीक्त दरमहा १०००/- रुपये देण्यात यावे* असे सांगितले परंतु जिल्हा प्रशासनातील सुपीक डोक्यानी *त्या शासन निर्णयाचा अर्थ चुकीचा लावून एप्रिल ते आँगस्ट काम करुन सुध्दा फक्त १०००/- रुपये देण्यात आले तर गट प्रवर्तकांना अजून पर्यत देण्यात आले नाही*
*केंद्र सरकारने मंजूर केलेला पिआयपी मध्ये कोरोणा भत्ता म्हणून २०००/- रुपये देण्याची मंजूरी दिली असून त्यानुसार दरमहा दोन हजार रुपये देण्यात यावे*
*कोरोणा अंतर्गत माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणासाठी प्रतिदिन ३००/- रुपये मोबदला देण्यात यावा. शासन निर्णय १७ जुलै २०२० नुसार आशा वर्कर २०००/- तर गट प्रवर्तक ३०००/- हजार मानधनवाढ त्वरीत देण्यात यावी. सर्व योजनाचा मोबदला दुप्पट करा.गट प्रवर्तकांचे कपात केलेले टिए ६२५ डाटा एन्टी २५०/- असे ८७५ रुपये पुर्ववत लागू करा* इत्यादी मागण्या निकाली काढाव्यात
*जिल्हा प्रशासनाने चार दिवसात योग्य न्याय न दिल्यास बेमुदत कामबंद करण्यात येईल* अशा इशारा राज्य सचिव सुजाता भगत राज्य कमेटी सदस्य विना पाटील शबाना शेख प्रतिभा वाघमारे सिंधू खडसे प्रमिला वानखेडे अरुणा खैरकार ज्योती वाघमारे नंदा महाकाळकर रेखा तेलतुंबडे वृंदा ढोके रेखा आदमने अश्वीनी वाघमारे लता भोयर अर्चना कोल्हे दुर्गा वाघमारे वैशाली निमसडे माधुरी गलांडे वैशाली नंदरे सविता वाघमारे शुभांगी टेकाडे वंदना नौकरकर उर्मिला वाटकर माधुरी सिरस्कार मंगला पाटील रंजना फुलझले सुमन चांदने कविता झिले सुलोचना पाचेकर जयश्री देशमुख अपर्णा आटे मंजू शेडे योगीता डाहाके रेखा आदमने ज्योषणा मुजेवार अर्चणा पोहाने उर्मिला वाटकर कविता भोगे प्रतिभा नाखले अस्मिता डाहाके सविता वाघ वंदना नौकरकर स्वाती पिंगळे शालीनी थुल गीता दुधकोर प्रमोदिनी भगत कल्पना खोकले ज्योषणा भुयार निर्मला भोयर शारदा जोगवे स्मिता मसे प्रतिभा जाधव
यांनी दिला आहे आँनलाईन बैठकीत १८५ आशा गटप्रवर्तक सहभागी होते.
Check Also
काजू-बादाम से ज्यादा फायदेमंद है भूरे रंग का ये टाइगर नटस् कन्द
काजू-बादाम से ज्यादा फायदेमंद है भूरे रंग का ये टाइगर नटस् कन्द टेकचंद्र सनोडिया …
जानिए त्वचा को गोरा बनाने के लिए जरुर खाईये काजू बादाम
जानिए त्वचा को गोरा बनाने के लिए जरुर खाईये काजू बादाम टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …