चाचण्या वाढविण्याकरिता जनजागृती मोहिम राबविण्याच्या प्रशासनाला सुचना
उत्स्र्फुत जनसहभागातुन कोविड महामारीला अटकाव करणे शक्य नाही
वर्धा जिल्हा प्रतिनिधी : वर्धा जिल्हयातील कोविड-19 महामारीचा प्रकोप दिवसंदिवस वाढत चाललेला असुन नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. एकाएकी वाढत चाललेली रुग्णसंख्या ही सर्वासाठी चिंतेची बाब असुन प्रशासनाने आगामी काळाचा विचार करुन सोईसुविधा व कोविड सेंटरची संख्या वाढविणे अत्यंत आवश्यक आहे या सोबतच उत्स्र्फुत जनसहभागातुन कोविड महामारीला अटकाव करणे शक्य नाही त्यामुळे प्रशासनाने येणा-या काळात जनसहभागातुन उपाययोजना कराव्या अश्या सुचना खासदार रामदासजी तडस यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत दिल्या.
दिनांक 18/09/2020 ला उपविभागीय अधिकारी कार्यालयात कोविड-19 संबधीत आढावा बैठक खासदार रामदास तडस यांनी घेतली यावेळी उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, वर्धा तहसीलदार प्रीती डुडुलकर, देवळी तहसीलदार राजेश सरवदे, मुख्याधिकारी एस.बी.महाजन, सहा.जिल्हा शल्य चिकीत्सक संजय गाठे, मुख्याधिकारी विपीन मुड्डा तालुका आरोग्य अधिकारी वर्धा डाॅ. माधुरी दिघेकर, देवळी डाॅ. प्रविण धमाने, सेलू डाॅ. स्वप्नील बेले, उपस्थित होते.
बैठकीमध्ये वर्धा उपविभागीय अंतर्गत येणा-या कोविड सेंटरची देखभाल, स्वच्छता, सुरक्षा, औषधाचा पुरवठा, रुग्णांना औषधोपचार, गृह विलगीकर इत्यादी प्रत्येक बाबीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. केन्द्रशासनाच्या सुचनेनुसार, केन्द्रीय गृह मंत्रालयाच्या परवानगी शिवाय लाॅकडाऊन हा विषय कंन्टोनमेंट झोनच्या बाहेर करता येणार नसल्याने सर्व सहमतीने व सर्वांच्या सहभागातुन यापुढे प्रशासनाने सामुहीक पध्दतीने निर्णय घ्यावा अशी सुचना देखील प्रशासनाला खासदार रामदास तडस यांनी दिली.
यावेळी उपआरोग्य अधिकारी डाॅ. वि.व्ही.वंजारी, गटविकास अधिकारी शंकर हाते, गटविकास अधिकारी अनिल आदेवार, प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते, कर प्रशासक अधिकारी देवेन्द्र निकोस, अभियंता रुपेश नवलाखे, नायब तहसीलदार आदेश डफ उपस्थित होते.