“माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेचा कन्नमवार ग्राम येथे आज शुभारंभ

घरी येणाऱ्या आरोग्य पथकांला आजाराची खरी माहिती द्यावी – जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे

वर्धा प्रतिनिधी :- दि 19 :-  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लवकर निदान केल्यास संशयीत रुग्ण तसेच अति जोखमीच्या रुग्णांना तात्काळ संदर्भसेवा मिळून  औषधोपचार मिळतील आणि मृत्यूचे प्रमाण कमी करता येईल. तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांमुळे पसरणारा संसर्ग थांबवता येईल. यासाठी जिल्हयातील नागरीकांनी  कुटुंबातील व्यक्तींची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या  आरोग्य पथकास आजाराची खरी माहिती द्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांनी केले.

“माझे कुटुंब- माझी जबाबदारी”  मोहिमेचा शुभारंभ आज श्रीमती गाखरे यांच्या उपस्थितीत कन्नमवार ग्राम येथे करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कारंजा पंचायत समिती सदस्य आम्रपाली बागडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. संदीप
नखाते,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश रंगारी,  वैद्यकीय अधिकारी
डॉ.कोमल घारपुरे,जिल्हा औषध निर्माण
अधिकारी सोज्वल उघडे तसेच  प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

वर्धा जिल्हयामध्ये कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव सर्वच तालुक्यांमध्ये वाढत आहे.  त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकामध्ये पुढील काळात आरोग्य विषयक वर्तनामध्ये बदल घडवून आणणे आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी आपणच घेऊ शकतो. त्यामुळेच गावातील सरपंच आणि ग्रामपंचयात सदस्यांनी पुढे ठेऊन लोकांमध्ये योग्य सवयी रुजविण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, आणि वारंवार हात स्वच्छ धुणे यासोबतच घरातील वृद्ध आणि लहान बालकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

या आजाराचे निदान लवकर झाल्यास लवकर उपचार मिळून व्यक्ती लवकर बरी होते. मात्र सर्दी, कोरडा खोकला, ताप, अशक्तपणा, जुलाब, श्वास घेण्यास त्रास इत्यादी लक्षणे असतानाही नागरिक चाचणी करण्यास घाबरतात, आणि आजार वाढल्यानंतर दवाखान्यात जातात. अशा निष्काळजीपणामुळे हा संसर्ग फुफुसामध्ये पसरत जातो आणि रूग्नाला वेळीच योग्य उपचार न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळे नागरिकांनी घरी तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य पथकास घरातील आजारी व्यक्तीची खरी व योग्य माहिती द्यावी. आजारपण लपवणे म्हणजे मृत्यूस आमंत्रण देणे होय असेही श्रीमती गाखरे यावेळी म्हणाल्या.

*अशी राबवणार मोहीम*
“माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम१५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत २ टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.
सदर मोहीमध्ये ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये आरोग्य पथकांच्या सहाय्याने
सर्वेक्षण करुन दररोज ५० घरांना भेटी देवून तपासणी करण्यात येणार आहे.
कोविड-१९ संशयित रुग्णांची तपासणी करुन त्यांना संदर्भित सेवा देण्यात येणार
आहे. सदर मोहमेमध्ये लोकप्रतिनिधी, खाजगी रुग्णालये व स्वयंसेवक यांचा सहभाग घेण्यात येणार आहे.

*603 पथक स्थापन*
जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यासाठी 603 आरोग्य पथक तयार करण्यात येणार आहे. या पथकात अंगणवाडी सेविका किंवा आशा,आरोग्य सेवक किंवा सेविका आणि स्वयंसेवक यांचा समावेश असणार आहे.

About Vishwbharat

Check Also

काजू-बादाम से ज्यादा फायदेमंद है भूरे रंग का ये टाइगर नटस् कन्द

काजू-बादाम से ज्यादा फायदेमंद है भूरे रंग का ये टाइगर नटस् कन्द   टेकचंद्र सनोडिया …

जानिए त्वचा को गोरा बनाने के लिए जरुर खाईये काजू बादाम

जानिए त्वचा को गोरा बनाने के लिए जरुर खाईये काजू बादाम टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *