वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- शनिवार दि.19 रोजी आज 526 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 117 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 74 पुरुष तर 43 महिलांंचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 6 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे .
आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (वर्धा- पुरुष 63, 68,78,
पुलगाव पुरुष 70, 78, आर्वी महिला 72 ) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 86 झाली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू -85 तर इतर आजारामुळे मृत्यू- 1 चा मृत्यू झाला आहे. आज 52 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.
आज आढळून आलेल्या रुग्णामध्ये
1)वर्धा 54 (पुरुष 34 महिला 20)
2)देवळी 11(पुरुष 9 महिला 2)
3) सेलू 11(पुरुष 7 महिला 4 )
4)आर्वी 5 (पुरुष 3 महिला 2)
5) आष्टी 3 (पुरुष 02 महिला 1 )
6) कारंजा 4 (पुरुष 2- महिला 2)
7)समुद्रपूर 1(पुरुष 0 – महिला 1)
8) हिंगणघाट 28(पुरुष 17 महिला 11) रुग्णांंचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठववलेले स्त्राव नमुने 30356 असून यामध्ये 30307 अहवाल प्राप्त झाले आहे. तर एकूण 26698 अहवाल निगेटिव्ह आले आहे.तर यामध्ये 49 अहवाल प्रलंबित आहे.जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांंची संख्या 3275 झाली असून यामध्ये एकूण 1580 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.
आज जिल्ह्यात एकूण 1609 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 76887 व्यक्ती गृह विलगिकरण करण्यात आले आहे.तर यामधून आज 1822 व्यक्ती गृहवीलगिकरणात आहे.
कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज 443 व्यक्तींना रुग्णालयातून सुटी मिळालेली आहे.आज आयसोलेशन मध्ये असलेले एकूण 1198 व्यक्ती आहे. जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्ण संख्या व मृत्यू संख्या पाहता नागरिकांनी जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे.त्याच सोबत शासन नियमांचे पालन करणे सुद्धा गरजेचे आहे.