Breaking News

अभिनव सामाजिक विकास संस्थेतर्फे “कु.आरती थेरेंचा” गौरव.

Advertisements
कोरपना(ता प्र.):-
    औद्योगिक दृष्ट्या संपन्न तसेच क्रिडा क्षेत्रात नावीन्य प्राप्त गडचांदूर शहरातील मध्यम वर्गीय कुटुंबाची “कु.आरती भास्कर थेरे” हिचा महाराष्ट्रातून तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी येथे होऊ घातलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२१ साठी निवड करण्यात आली आहे.आरती ही बीएससी सायन्स तृतीय वर्षात शिकत असून तामिळनाडू जाण्याची जिद्द तिने पूर्ण केली आणि काही दिवसातच ती खेळायला कन्याकुमारी येथे जाणार असल्याची माहिती आहे.सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत गडचांदूर अभिनव सामाजिक विकास संस्थेच्या सर्व सदस्यांनी पुस्तक, शाल व पुष्पगुच्छ देऊन आरतीचा गौरव केला आहे.यावेळी अतुल गोरे, मयुर एकरे,वैभव गोरे,संतोष महाडोळे,प्रदीप परसूटकर इत्यादींची उपस्थिती होती.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *