Breaking News

वर्धा जिल्ह्यात आयटकचे १५७ ठिकाणी  खाजगीकरण विरोधी दिवस, शहरात विविध ठिकाणी आंदोलन

Advertisements
 वर्धा जिल्ह्यात आयटकचे १५७ ठिकाणी  खाजगीकरण विरोधी दिवस
शहरात विविध ठिकाणी आंदोलन
———————————–
 वर्धा- सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व सेवा यांचे खाजगीकरण, कृषी कायदे, श्रमसंहिता, नवीन शैक्षणिक धोरण, पेट्रोलजन्य पदार्थ व अन्य जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ विरोधी आंदोलन जिल्ह्यात १५७ ठिकाणी आयटक व किसान सभा च्यावतिने यशस्वी  करण्यात आले
१५ मार्च २०२१ रोजी संपूर्ण देशभरातील किसान व कामगार संघटनांच्या कृती समित्यांनी खाजगीकरण विरोधी दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यानुसार वर्धा जिल्ह्यात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी  नकरता मास्क सानेटाझर .सामाजिक अंतर ठेवून जिल्ह्यात विविध  कामाच्या ठिकाणी  खाजगीकरण विरोध दिवस करण्याच्या सुचना कामगार नेते काँ दिलीप उटाणे यांच्या सुचनेनुसार करण्यात आले आशी माहीती आयटक जिल्हा सचिव काँ वंदना कोळणकर यांनी सांगतले.
केंद्र  सरकारने गेल्या सात वर्षात व विशेषतः गेल्या वर्षभरामध्ये शेतकरी विरोधी, कामगार विरोधी, कॉर्पोरेट धार्जिणे धोरण जास्तच आक्रमकपणे राबवायला सुरवात केली आहे. संकटात सापडलेल्या कृषीला व शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आखण्याऐवजी शेती क्षेत्र कॉर्पोरेटसच्या ताब्यात देण्यासाठी संसदीय लोकशाही धाब्यावर बसवून तीन कृषी कायदे आणले गेले. कामगार विरोधी चार श्रमसंहिता मंजूर करून कामगारांनी गेल्या शंभर वर्षात लढून मिळवलेले कामगार कायदे रद्द केले गेले. सत्तर वर्षांमध्ये देशातील जनतेच्या पैशांवर व श्रमावर उभ्या करण्यात आलेल्या सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. बड्या भांडवलदारांच्या ओसंडून वाहणाऱ्या तिजोऱ्यांना हात न लावता पेट्रोलजन्य पदार्थ व जीवनावश्यक वस्तूंवर भरमसाठ कर लावून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली जात आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षणाचे खाजगीकरण व बाजारीकरण केले जात आहे. वीज कायदा बदलून सर्वसामान्य जनता, शेतकरी व लहान उद्योगांना संकटात टाकण्याचा घाट घातला जात आहे. या सर्व जनविरोधी, देशविघातक धोरणांना आपला तीव्र विरोध असून आपण खालील मागण्या करीत आहोत.
1. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व सेवा यांचे खाजगीकरण, विक्री, थेट विदेशी गुंतवणूक व निर्गुंतवणूक करण्याचे धोरण रद्द करा. बँक, विमा, रेल्वे, संरक्षण, ऊर्जा, खाणी, आरोग्य, शिक्षण, अन्न सुरक्षा आदी क्षेत्रांमधील सार्वजनिक उद्योग व सेवांचे जास्त गुंतवणूक करून बळकटीकरण करा.
2. शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे ताबडतोब मागे घ्या.
3. कामगार कायदे रद्द करून मंजूर केलेल्या चार कामगार विरोधी, मालक धार्जिण्या श्रमसंहिता रद्द करून कामगारांच्या बाजूचे कायदे करा व त्यांची कडक अंमलबजावणी करा.
4. शिक्षणाचे खाजगीकरण, बाजारीकरण, सांप्रदायिकीकरण व अवैज्ञानिकीकरण करणारे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० रद्द करा.
5. पेट्रोलजन्य पदार्थ व जीवनावश्यक वस्तूंवरील करांमध्ये कपात व त्यावरील अनुदानात वाढ करून त्यांचे दर नियंत्रित करा. रेशन व्यवस्था बळकट करून तिचे सार्वत्रिकीकरण करा व सर्व जीवनावश्यक वस्तू रास्त दराने उपलब्ध करून द्या.
6. केंद्र शासनाच्या पोषण, शिक्षण, आरोग्य आदी सेवा देणाऱ्या सर्व योजनांचा दर्जा उंचावून त्यांना कायम करा व त्यात तळागाळात काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी, आशा, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी, आरोग्य विभागातील अंशकालीन स्त्री परिचर .कंञाटी आरोग्य नर्सेस इत्यादी योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी व पेन्शनसहित सामाजिक सुरक्षा लागू करा.
7 केंद्र व राज्य  सरकारने  अंगणवाडी , आशा, गटप्रवर्तक ,शापोआ कर्मचारी ,अंशकालीन स्त्री परिचर  इत्यादी योजना कामगारांना दिलेले पुर्ण करा.
आंदोलनांचे नेतृत्व  काँ सुरेश गोसावी काँ असलम पठाण  काँ वंदना कोळणकर सुजाता भगत  विजया पावडे शबाना शेख ज्योषणा राउत  प्रतिभा वाघमारे  ज्ञानेश्वरी डंबारे मंगला इंगोले  मैना उईके काँ गजेन्द  सुरकार काँ विनायक नन्नोरे  काँ मारोतराव इमडवार विना पाटील  प्रतिभा नैताम रेखा तेलतुंबडे सुनंदा आखाडे  माला भगत प्रज्ञा ढाले  रेखा काचोडे विमल कौरती  जयमाला बेलगे प्रमिला वानखेडे वृंदा ढोके  शबाना खान  रेखा नवले सुनिता टिपले  शोभा तिवारी ज्योती फुलझेले अल्का भानसे वंदना खोबरागडे  सिमा गढिया सुलभा तिरभाने पारबता जुनघरे अरुणा नागोसे रंजना तांबेकर सुरेखा रोहनकर  कुंदा काळबांधे आशा खोडे  पुष्पा नंरांजे शारदा जोगवे स्मिता मसे जयश्री देशमुख इरफाना पठाण शोभा सायंकार  सुजाता घोडे  वंदना बाचले  निर्मला देवतळे नंदा गिरडकर संगीता देवगीरकर संगीता  मोरे  शारदा कांबळे माया तितरे माधुरी शिरस्कार मंगला  पाटील वैशाली वाळके  माधुरी मुडे गोदावरी राउत रजनी पाटील   चंदा अंतकरे नँदा मोहरकर शुभांगी कांबळे नम्रता वानखेडे मिनाक्षी वाघमारे निर्मला सातपुके
Advertisements

About Vishwbharat

Check Also

मार्केटमध्ये आग लागून चार दुकाने खाक : अग्निशमन दल गायब

आज सोमवारी पहाटेच्या सुमारास चार दुकानाला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. …

रामनामाने नागपूर दुमदुमले, दीपोत्सव साजरा : अयोध्येत सकाळपासून भाविकांच्या रांगा

अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात रामलल्‍लाची काल सोमवार (२२ जानेवारी) रोजी प्राणप्रतिष्‍ठा करण्यात आली आहे. देशभरातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *