कामगार संघटना कोणी संपवील्या?.
जगातील कामगारानो एक हो!. असे म्हणतांना आता कोणी दिसत नाही.गर्वसे कहो हम कामगार नही हिंदू है !!!. म्हणणारे हिंदू ही आता कुठे दिसत नाही. “जो हक मांगनेसे ना मिले, उसे छिन के लेना पढता है. हे कामगार कर्मचारी अधिकारी एकूण ट्रेंड युनियनचे नेतृत्व करणारे नेते विसरले म्हणूनच कामगार संघटना, युनियन संपविला गेल्या.कामगारांची सांख्य लक्षवेधी असतांना कामगार संघटना,युनियन संपविला कोणी?.
ही भांडवलदारांची “हम दोन हमारे दोन” हुकुमशाही देशात मुळेघट्ट करीत आहे.
आरक्षणातील पदोन्नती साठी कामगार कर्मचाऱ्यांचा जो संघर्ष आज सुरू आहे.तेच जर स्वताच्या वैचारिक संघटना मजबूत केल्या असत्या तर,आज तो संघर्ष त्यांना करावा लागला नसता.त्यांचा कामगार चळवळीचा इतिहास वाचला असता तर?. जगातील ज्या काही क्रांत्या झाल्यात त्यामध्ये कामगारांची महत्वपूर्ण भूमिका होती. हे लक्षात आले असते.
कामगार संघटनांनी शासनावर नेहमी दबाव ठेवावा, जर शासन ऐकत नसेल तर सत्ता हस्तगत करावी. ही बाब बाबासाहेबांनी मुबंईच्या मील संपाच्या भाषणात प्राकर्षाने सांगितली होती. पण आम्ही या बाबीकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे याचा फायदा अनेक मनूवादी कामगार संघटनांनी उचलला.त्यांनी राष्ट्रीय ट्रेंड युनियन बनविल्या,भांडवलदार आणि सत्ताधारी पक्षाची त्यांनी हातमिळवणी केली. गर्वसे कहो सांगून आम्हाला मात्र जात,धर्म,प्रांतात गुंडाळून ठेवले. संघटित कामगारांना उध्वस्त करून असंघटीत कामगारांच्या फौजा निर्माण केल्या.कामगार कल्याण मंडलात सर्व त्यांचेच प्रतिनिधी (कामगारांच्या सभासद संख्येनुसार नाहीत) आहेत. त्यामुळे आजही आम्हाला minimum vej (किमान मजूरी) पूरेशी मिळत नाही. जनआंदोलनात आमची भाषा मात्र नेहमी “असा कसा देत नाही?. घेतल्या शिवाय राहत नाही!.” अशी असते. त्यामुळे आपल्याला जमिनीवर उभे राहून भान ठेवून बोलले व वागले पाहिजे.राष्ट्रीय संघटन बनविले पाहिजे की नाही?.किमान वेतन न दिल्या गेल्यामुळे देवयानी खोब्रागडे यांना परदेशात काय भोगावं लागलं हे यादेशातील प्रिंट मीडिया चॅनल मीडिया किती तरी महिने ओरडून सांगत होती. मिनीमम वेजचे इतर देशात काय महत्व आहे हे आपल्या देशातील कोणत्याच कामगारांच्या ट्रेंड युनियन व मीडियाच्या लक्षात येत नाही.
स्वतंत्र मजदूर यूनियन(आय एल यु ) संपूर्ण देशभर रेल्वे, विद्युत,बँक,कृषी,महसूल,जिल्हा परिषद, शिक्षक कर्मचारी,अंगणवाडी, इमारत बांधकाम कामगार, शेतकरी,शेतमजूर व सर्व संघटीत,असंघटीत कामगारांच्या संघटनेचे प्रतिनिधीत्व करून सनदशीर मार्गाने नेतृत्व करीत आहे.आपल्या मूलभूत हक्कासाठी राज्य व केंद्रा सरकारच्या विरोधात न्यायालयीन संघर्ष करीत आहे.
राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली, दबावाखाली ट्रेंड युनियनने काम केल्यामुळे कामगार कर्मचारी उद्धवस्त झालेत. राजकीय पक्ष हा नेहमी भांडवलदारांच्या आर्थिक मदतीने निवडणूका लढत असतो. त्याबदल्यात तो कामगार कर्मचाऱ्याच्या शोषण, अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उचलत नाही, राजकीय नेते कामगार कर्मचाऱ्यांना अपंग बनवुन ठेवतात.हा इतिहास सर्व कामगार कर्मचारी यांनी लक्षात घ्यावा. आताचे सरकार आर एस एस प्रणित आहे त्यांना यादेशाचे संविधान नको आहे,ते नष्ट करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे त्याहिसेबानी ते कामाला लागले आहेत. ९३ टक्के असंघटित कामगार जे ८५ टक्के मागासवर्गीय,आदिवासी,अल्पसंख्याक समाजातील मजूर,कामगार आहेत त्यांच्या समाजाच्या संघटना व त्यांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याकडे कोणतेही भविष्यातील नियोजन,उपाय योजनेचा आराखडा तयार नाही.
आंबेडकरी चळवळीतील कोणत्याही पक्ष संघटनेकडे या विरोधातील कृती कार्यक्रम नाही.आता आपण कामगार कर्मचारी गप्प बसलो तर केवळ आरक्षण नाही,तर संविधान लोकशाहीच्या मार्गानेच संपविल्या जात आहे.नंतर एक होतं संविधान असे म्हणण्याची पाळी आपल्यावर यायला ऊशीर लागणारं नाही.हीच वेळ आहे निर्णय घेण्याची यांचे उत्तर बाबासाहेबांनी तेव्हा दिले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३४ ला स्थापन केलेली सफाई कामगारांची म्युनिसिपल कामगार संघ,देशातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत मध्ये मान्यताप्राप्त ट्रेंड युनियन असली पाहिजे होती.१९३६ साली स्थापन केलेली स्वतंत्र मजदूर युनियन (आय एल यु )आहे.त्यात देशभरातील मागासवर्गीय कामगार कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन बाबासाहेबांनी १९३८ ला मनमाड येथे रेल्वे गँगमन कामगारांच्या दोनदिवशीय परिषद मध्ये केले होते. तेव्हाच हे ही सांगितले होते की कामगारांचे दोनच शत्रू आहेत,एक भांडवलशाही दुसरी ब्राह्मणशाही हे कायम लक्षात ठेवा. आज यांनी हात मिळवणी करून देशाच्या सर्व प्रशासकीय यंत्रणा ताब्यात घेतल्या आहेत.
आज आता आरक्षण लाभार्थीच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत,नव्हे पुढील पिढीचे भविष्य अंधकारमय होणार आहे.म्हणूनच सर्व आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांनी ट्रेंड युनियन मध्ये काम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आता आपली खरी ओळख दाखविण्याची वेळ आली आहे.
भारतातील बहुसंख्येने कामगार कर्मचारी हा मागासवर्गीय शोषित,पिढीत व आदिवासी, अल्पसंख्याक अन्यायग्रस्त असल्याने त्यांना ६५ वर्षानंतर ही सामाजिक व आर्थिक न्याय मिळू शकला नाही. आताच्या आर एस एस प्रणित भाजपा सरकारने एक हजार कामगार कायदे विना चर्चा रद्द करून टाकले.शेतकरी शेतमजूर, असंघटीत कामगार यांचे प्रश्न तर संघटीत कामगारांच्या प्रश्नापेक्षा विक्राळ स्वरूपात उभे आहेत.त्यावर प्रस्थापित कामगार चळवळी कोणताच वैचारिक संघर्ष करण्यासाठी तयार नाही. त्याचे दुःख मागासवर्गीय कामगार कर्मचाऱ्यांना बिलकुल नाही.भारतात आजमितीला सात टक्के संघटीत कामगारांच्या ५५ हजार युनियन नोंदणीकृत आहेत.तर ९३ टक्के असंघटीत कामगारांच्या राष्ट्रीय युनियन नाहीत. त्यांच्या करीता वैचारीक पातळीच्या तेरा राष्ट्रीय ट्रेंड युनियन कार्यरत आहेत.त्यांची अधिकृत मान्यता ही मागासवर्गीय कामगार कर्मचाऱ्यांच्या मेंबरशिप वर अवलंबून आहे.त्या या प्रमाणे आहेत.१) ऑल इंडिया ट्रेंड युनियन काँग्रेस (AITUC ),२) सेंटर ऑफ इंडियन ट्रेंड युनियन (CITU),३) भारतीय मजदूर संघ (BMS),४)हिंद माजदूर किसान पंचायत (HMKP),५) हिंद मजदूर सभा (HMS),६) इंडियन फेडरेशन ऑफ फ्री ट्रेंड युनियन (IFFTU),७) इंडियन नॅशनल ट्रेंड युनियन काँग्रेस (INTUC),८) नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेंड युनियन (NFITU),९) नॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (NLO),१०) ट्रेंड युनियन को-ऑडीनेशन सेंटर ( TUCC),११) युनायटेड ट्रेंड युनियन काँग्रेस (UTUC),१२) युनायटेड ट्रेंड युनियन काँग्रेस-लेनिन (UTUC-L), १३) कॉन्फडेरेशन ऑफ फ्री ट्रेंड युनियन ऑफ इंडिया (CFTUI).यांची राजकीय विचारधारा वेगवेगळी जरी असली तरी त्यांचे सांस्कृतिक संस्कार,मुख्य उद्धिष्ट एकच आहे. हे आम्ही विसरतो. म्हणूनच आमची सांख्य लक्षवेधी असतांना कामगार संघटना,युनियन संपविला कोणी?. यांचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे.
देशातील तमाम मागासवर्गीय कामगार कर्मचारी यांनी आपल्या संघटना, युनियन आंबेडकरी विचारांच्या राष्ट्रीय ट्रेंड युनियनशी संलग्न करून शक्ती प्रदर्शन करावे.असा कसा देत नाही,घेतल्या शिवाय राहत नाही!.ही भाषा आता बंद करावी, तुमची अधिकृतपणे सभासद नोंदणी कोणा कडे आहे?. त्यांचा फायदा कोण कसा घेतो त्यांचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. दरवर्षी तुमच्या संघटनेचे युनियनचे ऑडिट रिपोर्ट सादर होत नसतील तर तुमची दखल कोण घेणार?.म्हणूनच नोंदणीकृत सभासद बनून भविष्य उज्वल करण्यासाठी आरक्षण लाभार्थी कर्मचाऱ्यांनी स्वाभिमानी बनावे!.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेे शेवटचे शब्द बघा हे वाचून तरी सगळयांचे डोळे उघडतील अशी अपेक्षा करतो. बाबासाहेब म्हणाले मी माझ्या संपूर्ण आयुष्यात लढलो, तो फक्त तुमच्यासाठी तुम्ही सुखात रहावं म्हणून यासाठी मी माझ्या संसाराकडे लक्ष नाही दिलं मी नामवंत विद्यापिठाच्या पदव्या घेऊन आलो M.A., PH.D., M.SC, D.SC L.L.B.तेव्हा मला मुंबईच्या हायकोर्टाच्या न्यायाधीशाची नोकरी सरकार देत होते. पण मी ती नाकारली. का?.कारण मला फक्त समाजाला न्याय मिळवून द्याचा होता.मी सुद्धा एक मंत्री बनून आरामात आयुष्य जगलो असतो.पण नाही. माझा जन्म झाला होता आराम न करण्यासाठी.मी तुमच्यासाठी गोलमेज परिषदेत भांडलो. महार,मांग,चांभार,सुतार, लोहार,माळी,धनगर, कुणबी, कोळी या माझ्या अस्पृश्य बांधवांसाठी मी लढलो.मी हिंदु धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धर्म स्विकारला. पण मी माझ्या हिंदु माता-भगिनींसाठी “हिंदु कोड बिल” बनवलं.त्यात मी स्त्रीयांसाठी घटस्फोटाचा अधिकार वडीलांच्या संपत्तीमध्ये मुलीला समान अधिकार दिले.मी तुम्हाला एवढं सगळं दिलं.मी संविधानात SC,ST,OBC,NT यांना आरक्षण दिलं.पण बांधवांनो तुम्ही मला काय दिलंत.तुम्हाला जर मला काय द्यायचं असेल तर एक काम करा.हे सर्व बहुजन मागासवर्गीय समाजातील कामगार कर्मचारी यांनी एक व्हावे.तुम्ही सर्वांनी एकत्र या कारण तुम्ही जर एकत्र आलात तरच तुम्ही पुढील येणाऱ्या संकटांशी सामना करू शकाल. असा कसा देत नाही,घेतल्या शिवाय राहत नाही!. असे किती दिवस म्हणत राहणार?. लोकसंख्याच्या एकूण हिशेबाने आपण सत्ताधारी असले पाहिजे किंवा विरोधी पक्षात आपले वर्चस्व प्रस्थापित झाले पाहिजे होते.शासन,प्रशासनावर आपला कायमस्वरूपी दबाव आणि नियंत्रण असले पाहिजे होते.ते का होत नाही. यांचा सर्व मजूर, कामगार,कर्मचारी अधिकारी यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.आमची सांख्य लक्षवेधी असतांना कामगार संघटना,युनियन संपविला कोणी?.
आयु.सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.
अध्यक्ष- स्वतंत्र मजदूर युनियन, महाराष्ट्र राज्य,