कारच्या अपघातात बिबट्याचा मृत्यू
चंद्रपूर-
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली-पद्मापूर मार्गालगत एका बिबट्याचा मृतदेह गुरूवारी सकाळच्या सुमारास आढळला. कारच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज सहाय्यक वनसंरक्षक बी.सी. येळे यांनी व्यक्त केला आहे. रविवारी ज्या ठिकाणी भरधाव कारने झाडाला धडक दिली, त्याच ठिकाणी थोड्या अंतरावर मृत बिबट आढळला असल्याचे त्यांनी लाभला सांगितले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पद्मापूर गेट पासून 500 मीटर अंतरावर आहे. 21 मार्च रोजी रात्री 9.30 च्या सुमारास एम. एच. 34-बीआर- 6979 या क्रमांकाच्या कारने झाडाला भीषण धडक दिली होती. या अपघातात दोन पर्यटक गंभीर जखमी झाले होते. शिवाय कारचा समोरील भागाचे मोठे नुकसान झाले झाला होता.
त्यानंतर तेथे तिसर्या दिवशी दुर्गंधी पसरल्याने वनाधिकार्यांनी शोध घेतला असता, बिबट मृतावस्थेत आढळून आला. रविवारी ज्या ठिकाणी कारने झाडाला धडक दिली, त्याच ठिकाणी थोड्या अंतरावर मृत बिबट्या आढळल्याने कारच्या अपघातात बिबट्याचा मृत्यू झाला असून, बिबट्याचे केस कारला चिटकलेले आढळून आले आहे. उत्तरीय तपासणीत मृत बिबट्याच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे.
मानेचे हाड मोडले असून, समोरील पायही तुटला असून, मृत बिबट 5 ते 6 वर्ष वयाचा असल्याचे येळे यांनी सांगितले. वन्यजीवांची मोठी वर्दळ असलेल्या मोहर्ली मार्गावर पर्यटक वाहनांचा वेग वाढवतात, ही वनविभागासाठी चिंतेची बाब आहे. वनपथक घटनास्थळी दाखल झाले असून, मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी सहायक वन संरक्षक येडे, वन परीक्षेत्रअधिकारी मुन, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे, डॉ. कडुकर, डॉ. खोब्रागडे, डॉ. पोदाचलवार उपस्थित होते.
Check Also
नागपूरकर रसिकांना दोन दिवसीय नाट्य मेजवानी
शुक्रवारपासून महावितरणची राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा नागपूर, दि. 6 जुलै 2024:- महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्य नाट्य स्पर्धा नागपूर परिमंडलाच्या यजमान …
नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!
नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …