Breaking News

शेगावात दारू विक्रत्यांचे पुन्हा डोके वर .., शेगांव पोलिसांचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष …

शेगावात दारू विक्रत्यांचे पुन्हा डोके वर ..
* शेगांव पोलिसांचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष …
वरोरा:-आलेख रट्टे
स्थानिक शेगाव बू येथे सध्याच्या परिस्थितीत पाहायला असता गावात प्रत्येक गेलो गल्ली तसेच गाव खेड्यात दारू तसेच एेव्याध्य  धंदे सर्रास सुरू असून या कडे थानिक पोलीस स्टेशनचे ठाणेदार  यांचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने यांच्यावर गावातील जनता टीकाटिपणी करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.
              विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून येथील तसेच परिसरातील अनेक गावात दारू विक्री जोमात सुरू आहे   शेगाव , येथील बाजार वाडी , बस स्टॉप , बाजार गुजरी ,  हॉटेल , पान टपरी , व अन्य गावातील लोक जमाव ठिकाणी चौकात सहज रित्या दारू  विक्री बिनधास्त सुरू आहे  या विक्रेत्यांना पोलीस पाठबळ देऊन त्यांच्या कडून मोठ्या प्रमाणात  मासिक महिना , हप्ता म्हणून लाखो रुपये घेत असल्याचे सांगण्यात येते . याच सोबत  चारगाव , गुजगव्हण , वहानंगाव  अश्या अनेक गावात दररोज लाखो रुपयांची देशी, विदेशी दारू  विक्री जोमात सुरू आहे.तर  दारू तस्करी करणारे दारू तस्कर यांच्या कडून येथील ठाणेदार लाखो रुपये घेत असून यांची वाहने रात्रौला आपल्या हद्दीतून  पासिंग  करून गाव खेड्या पर्यंत पोहचविण्याचे  कार्य करीत असल्याचे नागरिक ओरडतात .
        तर काही नागरिक, नवयुवक ज्यादा पैसा कमावण्याच्या नादात अवैध दारू विक्री करण्याच्या मार्गी लागले असून  येथील पोलीस प्रशासन पैसा घेऊन कुणालाही व केव्हा ही दारू विक्री चा परवाना देत दारू विक्री करण्यास पाठबळ देतात तर काही युवक पोलीस आपल्या खाकीचा रुबाब दाखवत दारू विक्रेत्यांना धमकावून सुद्धा  पैसा वसूल करतात तर काही ठिकाणी चक्क पोलिसांच्या डोळ्या समोरच देशी विदेशी दारू विक्री केली जाते तेव्हा पोलीस कारवाई का करीत नाही असा सवाल ? नागरिकांनी केला असता आमचे पक्के मित्र आहेत असे सांगण्यात येते . तेव्हा दारू विक्रते व पोलीस यांचे नाते सख्या भावा पेक्षाही अधिक पक्के असल्याचे समजते तेव्हा या गंभीर समस्याची दखल घेत वरीष्ठ अधिकारी काय दखल घेतील या कडे सर्व नागरिकांचे लक्ष्य वेधले आहे ..

About Vishwbharat

Check Also

विदर्भातील सर्व बार बंद होणार? : मद्यप्रेमींची चिंता वाढली

शासनाच्या मद्य विक्रीवरील धोरणामुळे हॉटेल व्यवसाय बंद पडण्याचा धोका निर्माण झाला असून त्याविरोधात लढा देण्याचा …

PWD, नागपुरातील दुय्यम निबंधकाकडून राष्ट्रध्वज फडकविताना नियमभंग

स्वातंत्र्य दिनाच्या वेळी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील भगतसिंग चौक येथे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *