Breaking News

सोनोग्राफी केंद्रांची नियमीत तपासणी करा – जिल्हाधिकारी गुल्हाने यांचे निर्देश

सोनोग्राफी केंद्रांची नियमीत तपासणी करा

गर्भलिंगनिदान दक्षता पथकाच्या सभेत जिल्हाधिकारी गुल्हाने यांचे निर्देश

चंद्रपूर,  : गर्भपात व सोनोग्राफी केंद्रावर अवैधिरित्या गर्भलिंगपरिक्षण करणे कायद्याने गुन्हा असून जिल्ह्यात असे प्रकार होऊ नये म्हणून नियमितपणे सोनोग्राफी केद्रांची तपासणी करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज दिले.

गर्भधारणापुर्व व प्रसुतीपुर्व निदान तंत्र अधिनियम अंतर्गत दक्षत पथकाची सभा जिल्हाधिकारी गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वीस कलमी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेला अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत कन्नाके, महानगरपालीकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, ॲड. विजया बांगडे, प्रमोद उंदीरवाडे व संबंधीत तालुक्यातील वैद्यकीय अधिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.

गर्भधारणापुर्व व प्रसुतीपुर्व निदान तंत्र अधिनियम अंतर्गत आतापर्यंत तालुकानिहाय काय कारवाई करण्यात आली, पेशन्टचे रजिस्ट्रेशन होते काय, ऑनलाईन माहिती न भरणाऱ्यावर काय कारवाई करणार इ. बाबत आढावा घेण्यात आला.

यावेळी वैद्यकीय अधिक्षक बी.एस. धुर्वे, डॉ. पी.वाय. खंडाळे, गो.वा.भगत, डॉ. मनिष सिंग, डॉ. रोहन झाडे, डॉ. अर्पिता वारकर, डॉ. नयना उत्तरवार, कांचन वरठी, तसेच संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

About Vishwbharat

Check Also

वात व्याधि अवसाद निवारण के लिए अश्वगंधारिष्ट सिरप के लाभ

वात व्याधि अवसाद निवारण के लिए अश्वगंधारिष्ट सिरप के लाभ टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

सेहत का खजाना मूंगफली बाजार में आते ही मचा दी धूम

सेहत का खजाना मूंगफली बाजार में आते ही मचा दी धूम? टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *