बंगालमध्ये विक्रमी 80 टक्के मतदान,ममता बॅनर्जी, सुवेंदू अधिकारींचे भाग्य इव्हीएममध्ये बंद 

बंगालमध्ये विक्रमी 80 टक्के मतदान
 ममता बॅनर्जी, सुवेंदू अधिकारींचे भाग्य इव्हीएममध्ये बंद 
कोलकाता-
पश्चिम बंगााल विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात आज गुरुवारी विक्रमी 80.43 टक्के मतदान झाले. विधानसभेच्या 30 जागांसाठी घेण्यात आलेल्या या टप्प्यात 171 उमेदवारांचे भाग्य मतदारांनी इव्हीएममध्ये बंद केले आहे. आज नंदीग्राम मतदारसंघातही निवडणूक घेण्यात आल्याने, संपूर्ण देशाचे लक्ष या दुसर्‍या टप्प्याकडे लागले होते.
ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममध्ये त्यांच्याच तृणमूल काँगे्रसमधून भाजपात आलेले सुवेंदू अधिकारी यांनी कडवे आव्हान दिले आहे. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच मनात पराभवाची भीती निर्माण झालेल्या ममता बॅनर्जी मागील तीन दिवसांपासून नंदीग्राममध्ये तळ ठोकून होत्या, हे विशेष.
बंगाालमधील सर्व 30 मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांच्या रांगा दिसत होत्या. काही मतदार संघ अतिशय संवेदनशील असल्याने, तिथे निमलष्करी दलांच्या जादा तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी भाजपा आणि तृणमूल काँगे्रसच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्षही झाला. सायंकाळी उशिरापर्यंत रांगा असल्याने, मतदानासााठी सुमारे अर्धा तास जास्त वेळ देण्यात आली होती. दुसर्‍या टप्प्यात 80.43 टक्के मतदानाची नोंद प्राथमिक असून, रात्री उशिरापर्यंत संपूर्ण आकडेवारी आल्यानंतरच खरी टक्केवारी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍याने दिली.
आसाममध्ये 74 टक्के मतदान
आसाममध्ये दुसर्‍या टप्प्यात 39 जागांसाठी मतदान घेण्यात आले असून, सायंकाळपर्यंत 74 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आयोगाने दिली. दुसर्‍या टप्प्यात 345 उमेदवार रिंगणात आहेत. येथे सर्वच मतदारसंघांमध्ये अतिशय शांततेत मतदान पार पडले.
ममता बॅनर्जी नौटंकी करताहेत : अधिकारी
मागील तीन दिवसांपासून ममता बॅनर्जी नंदीग्राामध्ये तळ ठोकून आहेत. 90 टक्के मतदान माझ्यासाठी झाल्याचा त्यांचा दावा आहे, पण सकाळपासून मला केवळ माझीच लाट दिसत आहे. ममता केवळ सहानुभूतीसाठी नौटंकी करीत आहेत, असा चिमटा भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी काढला.
नंदीग्रामची नाही, लोकशाहीची चिंता : ममता
नंदीग्राम मतदारसंघात मला माझ्या विजयाची नाही, तर लोकशाहीची चिंता वाटत आहे. भाजपाचे कार्यकर्ते मतदारांना हाकलत आहेत, त्यांना मतदान करण्यापासून रोखत आहेत, घरात जाऊन धमक्या दिल्या जात आहेत. तृणमूलच्या कार्यकर्त्यांना काही ठिकाणी मारहाणही झाली. भाजपाने कितीही प्रयत्न केले, तरी विजय माझाच होणार, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला.
मतदारसंघ                  टक्केवारी
नंदीग्राम                         80.79
बांकुरा                             82.78
पश्चिम मिदनापूर           78.05
पूर्व मिदनापूर                   81.23
दक्षिण 24 परगणा          79.66

About Vishwbharat

Check Also

बांग्लादेशी घुसपैठियों को देश सें निकालने का आदेश: सुप्रीम कोर्ट की महत्वपूर्ण टिप्पणी?

बांग्लादेशी घुसपैठियों को देश सें निकालने का आदेश: सुप्रीम कोर्ट की महत्वपूर्ण टिप्पणी? टेकचंद्र सनोडिया …

उद्योग जगत के मशहूर उद्योगपति रतन टाटा का 86 वर्ष की उम्र में निधन

उद्योग जगत के मशहूर उद्योगपति रतन टाटा का 86 वर्ष की उम्र में निधन   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *