अधिकार्यास लाच घेताना अटक
चंद्रपूर-
जमिनीचे फेरफार करुन देण्याच्या कामासाठी 1 हजार 500 रुपयाची लाच स्वीकारणार्या भद्रावती तहसिल कार्यालयातील मंडळ अधिकार्यास रंगेहाथ अटक करण्यात आली. प्रशांत नरेंद्रप्रतापसिंह बैस असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही कारवाई गुरूवार, 1 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
चंद्रपूर येथील रहिवासी तक्रारदार यांची चंदनखेडा साजा अंतर्गत चरूर घारापुरी येथे शेती आहे. या शेतजमिनीचे फेरफार करण्यासाठी तक्रारदाराने आरोपीकडे अर्ज केला. जमिनीचे फेरफार करण्यासाठी त्याने 2 हजार रूपयाची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार नोंदवली. गुरूवारी सापळा रचून पडताळणी करण्यात आली. तडजोडीअंती 1 हजार 500 रूपये स्वीकारण्याचे आरोपीने मान्य केले. ही रक्कम स्वीकारताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरूद्ध भद्रावती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस उपायुक्त रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद तोतरे, पोलिस उपअधिक्षक अविनाश भामरे, मनोहर एकोणकर, संतोष येलपूलवार, अजय बागेसर, रोशन चांदेकर, रवी ढेगळे, समिक्षा भोंगळे, सतिश सिडाम यांनी केली.

अधिकार्यास लाच घेताना अटक
Advertisements
Advertisements
Advertisements