Breaking News

 राजुरा नगर परिषदेचा अभिनव उपक्रम,गृह विलगिकरणातील रुग्णांना घरपोच फळे

Advertisements

गृह विलगिकरणातील रुग्णांना घरपोच फळे
 राजुरा नगर परिषदेचा अभिनव उपक्रम
राजुरा-
सध्या संपूर्ण देशात कोरोणा या महामारीने आपले हात पाय पसरवले असतानाच राजुरा तालुक्यात जनसंचारबंदीचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या या जनसंचारबदीला सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशातच राजुरा नगर परिषद प्रशासनाने एक चांगला निर्णय घेतला असून, जनता संचारबंदीमुळे संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने गृह विलगीकरणामधील कोरोना बाधित रुग्णांकरिता घरपोच फळ उपलब्ध करून दिल्या जात आहे.
नगरपरिषद क्षेत्रातील 19 एप्रिल ते 26 एप्रिलपर्यंत जनता जनसंचारबंदी असल्यामुळे सर्व परिसर बंद आहे. तसेच फौजदारी सहिता कलम 144 लागू असल्याने फिरण्यास, जमावास व संचार करण्यास बंदी आहे. अशा परिस्थितीत गृहविलगिरणामध्ये असणार्‍या रुग्णांना फळांची घरपोच सेवा देण्याकरिता नगर परिषदेने राहुल रतनकर (9552448318), विपुल दुर्गे (7768829469), लक्ष्मण मोहुर्ले (9067375088) यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचार्‍यांशी रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधावा त्वरित आपणास सहकार्य करण्यात येईल, असे आवाहन नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आर्शिया जुही यांनी केले आहे.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

गोंदिया विमानतळावरून इंदूर,दिल्ली,बंगळुरू विमानसेवा

गोंदिया जिल्ह्यातील बिरसी येथील विमानतळावरून सध्या इंडिगोची गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती ही विमानसेवा सुरू आहे. यानंतर १६ सप्टेंबर …

विदर्भातील सर्व बार बंद होणार? : मद्यप्रेमींची चिंता वाढली

शासनाच्या मद्य विक्रीवरील धोरणामुळे हॉटेल व्यवसाय बंद पडण्याचा धोका निर्माण झाला असून त्याविरोधात लढा देण्याचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *