गृह विलगिकरणातील रुग्णांना घरपोच फळे
राजुरा नगर परिषदेचा अभिनव उपक्रम
राजुरा-
सध्या संपूर्ण देशात कोरोणा या महामारीने आपले हात पाय पसरवले असतानाच राजुरा तालुक्यात जनसंचारबंदीचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या या जनसंचारबदीला सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशातच राजुरा नगर परिषद प्रशासनाने एक चांगला निर्णय घेतला असून, जनता संचारबंदीमुळे संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने गृह विलगीकरणामधील कोरोना बाधित रुग्णांकरिता घरपोच फळ उपलब्ध करून दिल्या जात आहे.
नगरपरिषद क्षेत्रातील 19 एप्रिल ते 26 एप्रिलपर्यंत जनता जनसंचारबंदी असल्यामुळे सर्व परिसर बंद आहे. तसेच फौजदारी सहिता कलम 144 लागू असल्याने फिरण्यास, जमावास व संचार करण्यास बंदी आहे. अशा परिस्थितीत गृहविलगिरणामध्ये असणार्या रुग्णांना फळांची घरपोच सेवा देण्याकरिता नगर परिषदेने राहुल रतनकर (9552448318), विपुल दुर्गे (7768829469), लक्ष्मण मोहुर्ले (9067375088) यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचार्यांशी रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधावा त्वरित आपणास सहकार्य करण्यात येईल, असे आवाहन नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आर्शिया जुही यांनी केले आहे.

राजुरा नगर परिषदेचा अभिनव उपक्रम,गृह विलगिकरणातील रुग्णांना घरपोच फळे
Advertisements
Advertisements
Advertisements