ए.सी.सी. कंपनीच्या विरोधात पि.एफ. चोरी व अन्य मागण्या घेवून आंदोलन

घुग्घुस-प्रभाकर कुम्मरी- दि. 10 जून 2021 रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चा ए.सी.सी. कंपनीच्या विरोधात पि.एफ. चोरी व अन्य मागण्या घेवून आंदोलनाला 6 वा दिवस सुरू असून अजून पर्यंत ए.सी.सी. प्रशासन व शासनाकडून कुणीही सदिच्छा भेट सुध्दा दिली नाही या वरुण असे दिसून येते की शासना व ए.सी.सी प्रशासनाची साठगाठ असल्याचे चित्र दिसून येत आहे म्हणून आम्हाला या प्रिन्ट मीडिया द्वारे कामगारांच्या विषय व मागण्या हे शासनासमोर आणायचे आहे जेणे करून या कामगारांवर झालेले शोषन या प्रिन्ट मिडीया द्वारे ए.सी.सी प्रशासन व शासनाला जाग येईल असे बि.आर.एस.पी जिल्हा महासचिव सुरेश म.पाईकराव यांनी सांगितले सर्वाना आपल्या हक्कासाठी व अधिकारासाठी लढण्यासाठी व आंदोलन करण्याचा अधिकार सुद्धा आहे ज्या गोष्टी जे काही आपल्या शासन मान्य सुविधा आहे ते जर कामगाराला बरोबर मिळत नसेल त्या विषयासाठी लढा देण्याचा सुद्धा कामगारांना आंदोलन उभारण्याचा सुद्धा अधिकार आहे ए.सी.सी चांदा सिमेंट कंपनी नकोडा येथे तिरुपती कंस्ट्रक्शन नितीन शर्मा या ठेकेदाराने न्यु पॅकिंग हाऊस प्लॅन्ट 190 व मेन्टेनन्स डिपार्टमेन्ट येथील 13 कामगार असुन या 190 कामगाराचा 2011 पासून ते आज पर्यत पि.एफ बरोबर भरला नाही तर 13 कामगार हे 2014 पासुन कार्यरत आहे तर या ठेकेदाराने 2016 पासून PF कपात करणे सुरू केले आणि ते सुद्धा बरोबर भरल्या गेले नाही कामगारांना महिन्याच्या 15 ते 16 या पेक्षा कमी मासिक काम मिळते या 15 ते 16 दिवस किंवा या पेक्षा कमी दिवस काम मिळून कामगार आपला परिवार आपल्या मुला बाळांचे शिक्षण व आपले घर प्रपंच कसा काय चालविणार या कामगारांचे काम सुद्धा हेवि असून सिमेंट बॅग लोडिंग असून संपूर्ण 8 तास डस्ट मध्ये काम करावे लागते त्यांना मेडिकल सुविधा सुद्धा मिळत नाही जर त्या कामगारांना काही कमी जास्त झाल्यास कामगारांच्या परिवाराचे काय होणार या सर्व गोष्टींचा विचार करून त्या PF चोर ठेकेदाराचा ठेका बंद केला पाहिजे व या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे आम्ही ए.सी.सी कामगार हे आंदोलन ए.सी.सी चे काम बंद न ठेवता कंपनीचे गेट जाम न करता कुणालाही कामावर जाऊ नका असे सांगत सुध्दा नसुन हे आंदोलन आम्ही शांती पूर्वक करत आहो तरी पन आमच्या तीन आंदोलन कर्त्याला कामावर घेत नाही आहे व आठ कामगारांना कुरियन व्दारे पत्र पाठवून पत्रक बाजी वाटल्याबद्दल तुमच्यावर कारवाई करू अशी कामगारांना धमकी देत आहे व ए.सी.सी प्लांट मध्ये कामगार काम करतो त्या जागी पत्र लावले आहे त्या पत्रात असे लिहिले आहे की श्री. तिरुपती कंस्ट्रक्शन एव ए.सी.सी कंपनी के खिलाफ जो धरणा आंदोलन किया जा रहा है वह ( बेकायदेशीर, असवैधानिक, अवैध) है इस आंदोलन को जो कोई कामगार सहकार्य करते हुऐ पाया गया तो उसके खिलाफ उचित अनुशासनात्मक कारवाई की जाएगी असे म्हणुन कामगारांना धमकावले जात आहे व दबाव निर्माण करत आहे जर कामगाराने ठेकेदाराच्या किंवा ACC कंपनीचा दबावाने कमी जास्त केल्यास याचे जबाबदार ए.सी.सी कंपनी मॅनेजमेंट व ठेकेदार राहील या सर्व विषयाचे विचार केल्यास या आंदोलनात जे बावीस मागण्या ठेवल्या आहेत जर या सर्व मागण्या ए.सी.सी कंपनी प्रशासन कडून लवकरात लवकर मान्य न झाल्यास तर आम्ही या पेक्षाही तीव्र भूमिका घेवून आम्ही ए.सी.सी कंपनीच्या गेट समोर बेमुदत धरणा आंदोलन करू व ए.एल.सी ऑफीस च्या समोर सुद्धा धरणा देवू आम्ही घुग्घुस येथिल रहिवासी असून हा ए.सी.सी सिमेंट प्लॅन्ट घुग्घुसच्या अंतर्गत सिमेंट वाहतुक कोळसा वाहतुक हा घुग्घुस येथून होतो तर आम्ही यांचे वाहतुक सुद्धा येथून बंद करू हे सुद्धा आमची तयारी आहे असे बि.आर एस.पी जिल्हा महासचिव सुरेश म.पाईकराव यांनी सांगितले या वेळेस ईश्वर बेले, इरफान पठाण, दीपक दीप, सदानंद ढोरके, शरद पाईकराव, अशोक आसमपल्लीवार, सचिन माहुरे, एकनाथ पाऊनकर, दत्ता वाघमारे, ए जयाकर, समाधान गायकवाड, ए जयंत, प्रविण भोयर, शाम कंडे, एस.के.इस्राईल, राजकुमार परमेश, अजय नागपूरे, उपस्थित होते ” ”

 

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *