वर्धा; प्रतिनिधी; तिसरी लाट नको असेल तर नागरिकांनी शासन सूचनांचे पालन करावे.संभाव्य तिसऱ्या ससलाटेसाठी आपल्याला काहीतरी पूर्वतयारी करायचे जेणेकरून दुसरे लाटेमध्ये जेवढी जीवित हानी आपल्याला झाली ते होता कामा नये म्हणून येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला आपल्या गावामध्ये कोविड केअर सेंटर शाळा किंवा अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत जर मोठी असेल तर त्या ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी सूचना दिल्यात.जर गावामध्ये पेशंट निघतील आणि जे मायनर असतील अशा लोकांना केअर सेंटर च्या ठिकाणी ठेवण्यात यावे म्हणून त्यासाठी ग्रामपंचायतींना सूचना देऊन 15 वित्त चा निधी ग्रामपंचायतीला येत आहे तो खर्च करून सर्व त्यातून सोयीसुविधा तिथे करावयाचे आहे.तिसरी लाट हे आपल्या पर्यंत पोहोचला नको अशा प्रकारे आपण व्यवस्था आणि नीट काळजी घ्यायला पाहिजे तसेच तिसरी लाट नको असेल तर नागरिकांनीसुद्धा शासन सूचनांचे पालन करावे असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांनी केले.

संभावित तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींनी १५ व्या वित्त आयोगातून कोविड केयर सेंटर उभारावे;जिल्हा परिषद अध्यक्ष सरीता गाखरे
Advertisements
Advertisements
Advertisements