वर्धा; प्रतिनिधी;५ जून २०२१रोजी आवास दिनाच्या निमित्ताने महाआवास अभियानातंर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून ग्राम पंचयात इंझाळा ता.देवळी येथे श्री. सत्यजित बडे (अति.मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वर्धा) यांच्या उपस्थितीत श्री युवराजजी खडतकार उपसभापती (पं.स. देवळी) हस्ते प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पूर्ण झालेले श्रीमती माला खटेश्वर,श्री.नारायण नथुजी रोडे व श्री वामन किसनाजी भागडकर या लाभार्थ्यांना घराची चावी देऊन “गृह प्रवेश” करण्यात आला तसेच घरकुल बांधकाम मिळणारे अनुदाना मध्ये लाभार्थ्यांनी त्यामध्ये स्वतःपैसे खर्च करून उत्तम प्रकारचे घर बांधले आहे. तसेच शासनाच्या विविध योजनाच्या कृती संगमातून जसे स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून शौचालय बांधकाम पूर्ण झाले, उज्वला योजनेच्या माध्यमातून LPG गॅस मिळाला, सौभाग्य योजनेच्या माध्यमातून लाईट ची सोय व जल जीवन मिशन अंतर्गत ग्रा.पं ने नळ कनेक्शन देऊन स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली.पोषणा साठी घरकुल लाभधारकांना यावेळी महिंद्रा प्रेरणा सीएसआरच्या माध्यमातून परसबागेत लावण्यासाठी २० प्रकारचे भाजीपाला बियाणे किट देण्यात आले. तसेच ग्राम पंचायत अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी उपस्थिती :- श्री.पंकज भोयर सर (गट विकास अधिकारी पंचायत समिती देवळी), श्री.प्रविण कु-हे जिल्हा कार्यकारी अधिकारी (VSTF), श्री.राठोड (विस्तार अधिकारी देवळी), श्री.सचिन निकम तालुका समन्वयक (VSTF),सरपंच मा सौ शुभांगीताई संजय ढुमने, मा संजयराव ढुमने, सचिव श्री आर आर लाड, ग्रामपंचायत कर्मचारी श्री विलास बोबडे, श्री विशाल खडतकार, रोजगार सेवक श्री संतोष शिखरे, ग्राम पंचायत सगणक परिचालिक श्री हेमंत गुरनुले, इतर मान्यवर उपस्थित होते.