चंद्रपूर : चंद्रपूर येथील सुभद्रा कोटनाके यांची राजुरा तालुक्यातील भुरकूंडा गावातील ४.४८ हे.आर.शेतजमीन गैरआदिवासी महिलेला विकण्यास भाग पाडणार्या दोषीवर कारवाई करावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा सुुभद्रा कोटनाके यांनी पत्रपरिषदेतून दिला आहे. सुभद्रा कोटनाके यांच्या शेतीचा सौदा करीत वेणूगोपाल वेंकटस्वामी कोकाल्लू यांनी महेंद्र बोरा या आदिवासी महिलेल्या नावाने जमीन करण्यास सांगत शेती विक्रीचे ५० लाख रुपये मी देणार असे सांगीतले. वेणूगोपाल यांच्यावर विश्वास ठेवत कोटनाके यांनी संपूर्ण कागदपत्रावर सही केली. यानंतर २६ मार्च २१ ला नोंदणीकृत खरेदीखत करण्यापूर्वी कोटनाके यांना १८ लाख रुपये देण्यात आले व उर्वरीत रक्कम ३२ लाख चेक मार्फत देण्याच ठरले. यानंतर वेणूगोपालने इनोवा चारचाकी वाहन कोटनाके यांना दिली. मात्र सदर गाडी सर्वीसींग करता दिली असता तीचा चेसीस नंबर बनावट आढळला. त्यामुळे वाहन परत करुन पैसे देण्यास कोटनाके यांनी वेणूगोपालला सांगीतले. मात्र रक्कम न आणून दिल्याने कोटनाके यांनी चेक वटविण्याकरीता बँकेत गेले असता बँक खात्यात पैसे नसल्याचे आढळून आले. यामुळे वेणूगोपालशी संपर्क केला असता त्याने मोबाईल बंद करुन ठेवला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कोटनाके यांनी नोंदणीकृत दस्ताची पाहणी केली असता त्यांना धक्कादायक बाब उघडकीस आली. वेणूगोपाल यांनी उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्याकडून घेतलेली विक्रीची परवानगी बेकायदेशीर होती. असे कागदपत्र पाहल्यानंतर लक्षात आले. विक्रीची उर्वरीत रक्कम न मिळाल्याने कोटनाके यांनी शेतीचा ताबा दिला नाही.वेणूगोपाल यांनी सुरेखा यांच्या नावाने जमीन खरेदीखत केल्याच्या दिवशीच शेतजमीनीचे फेरफार करुन घेतले. मात्र फेरफार करण्यास कलम १५० प्रमाणे ३० दिवसाचा कालावधी घेणे बंधनकारक आहे. वेणूगोपाल यांनी शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून पैशाच्या जोरावर फसवणुकीचे काम केल्याचा आरोप कोटनाके यांनी केला आहे. यामुळे वेणूगोपाल यांनी बेकायदेशीरपणे नोंदणीकृत खरेदीखत तयार न करता उर्वरीत ३२ लाख रुपये न देता आदिवासी महिलेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. पुढील पोलिस कारवाई सुरु आहे. सदर फसवणूक प्रकरणी दोषी वेणूगोपालवर कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा सुभद्रा कोटनाके यांनी दिला आहे.
