Breaking News

जिल्हा क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन , नाग‍रिकांना सहभागी होण्याचे आवाहन

जिल्हा क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

Ø नाग‍रिकांना सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.18 जून : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी, चंद्रपूर यांच्या वतीने दि.21 जून 2021 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्हयात साजरा करण्यात येणार आहे. 21 जून 2021 रोजी सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करणेबाबत क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून सूचना करण्यात आल्या आहेत.

परिपत्रकानुसार जिल्ह्यातील विविध योग समितीचे पदाधिकारी, सभासद, युवक-युवती, खेळाडू व नागरिकांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करत सुरक्षित अंतर ठेवून सकाळी 6:45 ते 7:45 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे साजरा करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी सकाळी 6:30 वाजता उपस्थित राहून सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, अविनाश पुंड यांनी केले आहे.

About Vishwbharat

Check Also

चेहरे का कोलेजन बढाने की विधि और उपाय

चेहरे का कोलेजन बढाने की विधि और उपाय टेकचंद्र शास्त्री: 9822550220   नागपुर । चेहरे …

मेळघाटमधील कुपोषणामुळे मृत्यूचे वाढते प्रमाण गंभीर व चिंताजनक! 

मेळघाटमधील कुपोषणामुळे मृत्यूचे वाढते प्रमाण गंभीर व चिंताजनक! सरकार मेळघाटातमधील कुपोषण ग्रस्त भागात दुर्लक्ष करीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *