Breaking News

गडचांदूर न.प.स्थापनेसाठी पाठपुरावा करणाऱ्यावर आली “नाली सफाई” ची वेळ.

गडचांदूर न.प.स्थापनेसाठी पाठपुरावा करणाऱ्यावर आली “नाली सफाई” ची वेळ.
(मनमानी व सुस्त न.प.च्या कारभारामुळे शहरवासीयांना वैताग) 
कोरपना ता.प्र.:-
           कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदे बद्दल जितके बोलले तितके कमीच.शहरवासी नानाप्रकारच्या समस्याने त्रस्त असून याचे समाधान करण्यात स्थानिक न.प.सपशेल अपयशी ठरत असल्याचे आरोप होत आहे. शहरात स्वच्छतेचा अक्षरशः बोजवारा उडाला असून न.प.च्या सुस्त व मनमानी कारभाराला कंटाळून आरोग्याच्या दृष्टीने नागरिक स्वतःच आपल्या परिसरातील नाल्या सफाई करताना दिसून येत आहे. याचे ताजे उदाहरण २४ जून रोजी समोर आले.येथील समाजसेवक, गडचांदूर तालुका संघर्ष समितीचे संघटक “उद्धव पुरी” यांनी स्वतः घराजवळ गांधी चौक परिसरातील नाली सफाई केली.शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने याठिकाणी नगरपरिषद स्थापना व्हावी यासाठी पाठपुरावा करणाऱ्या पुरी यांच्यावरच जर नाली सफाईची वेळ येत असेल तर याला शोकांतिकाच म्हणावी लागेल.सदर कामामुळे पुरी यांच्या या कामचे काहींनी कौतुक केले तर काहींनी नगरपरिषदेवर ताशेरे ओढले आहे.
          कोरोना,डेंग्यू,मलेरिया,वायरल फिवर, टायफॉईड यासारख्या आजारापासून जर स्वतःचे रक्षण करायाचे असेल तर प्रत्येकांनी आपापले परिसर स्वच्छ ठेवावे. नगरपरिषद कर्मचारी,आरोग्य विभाग किंवा नगरसेवक यांच्याकडून जास्त अपेक्षा करू नये. “आपले कुटुंब,फक्त आपलीच जबाबदारी”  हे ओळखून सतर्क राहावे,असा मोलाचा सल्ला समाजसेवक उद्धव पुरी यांनी दिला आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात आरोग्याच्या दृष्टीने येथील वार्डा वार्डात नाली सफाई,फवारणी होईल अशी अपेक्षा पुरी यांना होती.मात्र येथील सुस्त न.प.ने याकडे लक्ष न दिल्याने यांनी स्वतःच हातात फावडा घेऊन घर,मंदिर परिसरातील नाली सफाई केली.वटपोर्णिमा सणाच्या निमित्ताने अनेक महिला गांधी चौक जवळील मंदिरात पुजाअर्चना करण्यासाठी येत असून अस्वच्छेमुळे आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची भीती लक्षात घेऊन पुरी यांनी गांधी चौक जवळची नाली स्वतः साफ केली.पावसाळ्यामुळे विविध आजार जोर धरतील,अगोदरच कोरोना आहे,ताप आला तर पहिले कोरोना तपासणी करावी लागेल,नाहीतर दवाखान्यात उपचार होणार नाही,कोरोनाची तिसरी लाट सुध्दा अपेक्षित आहे,न.प.ने स्वच्छते बाबत अगोदरच नियोजन करायला पाहिजे होते पण तसे झालेलं दिसत नाही. त्यामुळे न.प.कडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा सद्या ठेऊ नये,कारण सगळे प्रशासन आपल्या महत्वपूर्ण कामात व्यस्त आहे,सर्वांनी स्वतःच आपल्या परिसराची साफसफाई करावी,आपले व आपल्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी,असे आवाहन उद्धव पुरी यांनी केले आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *