Breaking News

ओबीसींचे राजकीय आरक्षणविरोधी महाविकास आघाडी सरकारविरुध्द हंसराज अहीर यांचे नेतृत्वात वरोरात आंदोलन

Advertisements

ओबीसींचे राजकीय आरक्षणविरोधी महाविकास आघाडी सरकारविरुध्द
राज्यव्यापी ‘‘चक्काजाम आंदोलनात‘‘ ओबीसी बांधवांनी सहभागी व्हावे  – हंसराज अहीर*
*हंसराज अहीर यांचे नेतृत्वात वरोरात आंदोलन*

Advertisements

चंद्रपूर:- राज्यातील शिवसेना-काॅेग्रेस-राष्ट्रवादी च्या महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्ष व नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आली असल्याने या सरकारचा जाहीर धिक्कार व सार्वत्रिक निषेध नोंदविण्यास तसेच हे आरक्षण पूर्ववत लागू करण्याच्या न्यायोचित मागणीसाठी भाजपा व प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने दि. 26 जून रोजी चंद्रपूर जिल्ह्यात पुकारण्यात आलेल्या ‘‘चक्काजाम आंदोलनात‘‘ ओबीसी बांधवांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होवून आपला राज्य सरकार विरोधातील आक्रोश एकजूटीने दाखवावा असे आवाहन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर यांनी केले आहे.
वरोरा येथे सकाळी 11 वाजता हंसराज अहीर यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून पडोली येथे पूर्व वित्त मंत्री आ. सुधिर मुनगंटीवार आंदोलनाचे नेतृत्व करतील तसेच जिल्ह्यातील तालुकास्तरावर भाजपाचे नेते मंडळी या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.
राज्य सरकारच्या निष्क्रिय धोरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना देवू केलेले 27 टक्के आरक्षण सुप्रिम कोर्टात वेळेवर बाजू न मांडल्यामुळे रद्द करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडी सरकाला 15 दिवंसांत मागासबर्गीय आयोग स्थापन करावा व ओबीसी समाजाचा म्उचपतपबंस क्ंजं सादर करण्याचे निर्देश दिले होते. महाविकास आघाडी सरकारने याकडे दुर्लक्ष करीत सदर माहिती वेळेवर सादर न केल्याने  ओबीसी बांधवांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे. परीणामी यापुढे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत ओबीसी समाजासाठी एकही जागा शिल्लक राहणार नाही. या अन्यायाविरुध्द राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी तसेच सदर क्ंजं त्वरीत सुप्रीम कोर्टात तातडीने सादर करवून घेण्यासाठी ओबीसी समाज बांधवांनी एकसंध होवून आपल्या न्याय हक्काचा आक्रमकपणे लढा लढण्यास या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी व्हावे व सरकारला ओबीसींच्या संघटीत शक्ती चे दर्शन घडवावे असे आवाहनही हंसराज अहीर यांनी केले आहे.
सदर चक्काजाम आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा जिल्हाधक्ष ग्रामीण देवराव भोंगळे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष ग्रामीण अविनाश पाल, भाजपा महानगराध्यक्ष डाॅ. मंगेश गुलवाडे, भाजपा ओबीसी मोर्चा  महानगराध्यक्ष विनोद शेरकी, वरोरा नगराध्यक्ष अहेतेशाम अली, डाॅ. भगवान गायकवाड, बाबा भागडे, ओम मांडवकर, सुरेश महाजन, जि.प. सभापती राजू गायकवाड, सायरा शेख, शुभांगी निंबाळकर,    जि.प. सदस्य ज्योती वाकडे, सौ. किन्नाके, रोहिणी देवतळे, खुशाल सोमलकर, पपीता गुळघाणे, वंदना दाते, राजू बच्चूवार, सचीन नरड, डाॅ. दुर्गे, शेंखर चैधरी, वसंता बावणे, विनोद लोहकरे, धनंजय  पिंपळशेंडे, बापू धात्रक, पप्पू साकरीया भद्रावती तालुक्यातील अशोक हजारे, चंद्रकांतपाटील गुंडावार, तुळशीराम श्रीरामे, विजय वानखेडे, नरेंद्र जीवतोडे, जि. प. सदस्य सौ. अर्चना जीवतोडे, प्रविण सूर, यशवंत वाघ, मारोती गायकवाड, पं.स. सभापती प्रविण ठेंगणे, पं.स सदस्य विद्या कांबळे, महेश टोंगे, प्रविण सातपूते, सुनिल नामोजवार, प्रशांत डाखरे, किशोर गोवारदिपे, इमा्रन खान, मधुकर सावनकर, संजय वासेकर, केतन शिंदे आदींनी केले आहे.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *