आणीबाणी ‘‘काळा दिवस’’ स्मरणार्थ शोभाताईंचा हंसराज अहीर यांचेव्दारा सन्मान
चंद्रपूर:- माजी पंतप्रधान दिवंगत इंदीरा गांधी यांनी 25 जुन 1975 मध्ये देशावर आणीबाणी लादली व या कालावधीत दमनकारी नितीचा अवलंब करून लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले या विरूध्द आवाज उठविणाऱ्यांना कारागृहात डांबले, अत्याचार केले, अनन्वित छळ केला त्यामुळे भाजपाव्दारे दरवर्षी हा दिवस संपूर्ण देशभरात सर्वत्र ‘‘काळा दिवस’’ म्हणुन पाळण्यात येतो. दि. 25 जुन 2021 रोजी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आणीबाणीच्या विरोधात लढ देणाÚया व सत्याग्रही म्हणुन शिक्षा भोगलेल्या भाजपाच्या वरीष्ठ नेत्या तथा राज्याच्या पूर्व मंत्री श्रीमती शोभाताई फडणवीस यांचे त्यांच्या मुल येथील निवासस्थानी जावून पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देवून यथोचित सन्मान केला.
यावेळी हंसराज अहीर यांनी श्रीमती शोभाताईंच्या राजकीय व सामाजिक कार्याचा सन्मानपूर्वक उल्लेख करीत त्यांच्या कार्यातून अनेकांनी प्रेरणा घेवून आपले राजकीय व सामाजिक कार्यात अमुल्य योगदान दिले आहे असे सांगीतले. याप्रसंगी खुशाल बोंडे, राजु घरोटे, पं.स. मुल सभापती चंदु मारगोनवर, प्रशांत समर्थ, महेंद्र खरकाडे, प्रशांत लाडवे, प्रशांत बोबाटे, राकेश ठाकरे, संतोष ठाकुरवार, प्रकाश चामटपल्लीवार, राकेश समर्थ, प्रविन मोहुर्ले, बबन गुंडावार, प्रमोद तोकुलवार यांची उपस्थिती होती. या दिवसाचे औचित्य साधत आणीबाणीच्या कालावधीत सत्याग्रहात सहभागी मिसांबदी बंडुभाऊ पद्लमवार, गिरीष अणे व अन्य प्रभ्रूतींचाही त्यांच्या निवासस्थानी जावून अहीर यांनी सन्मान केला.
Check Also
नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?
महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …
नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र
नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …