Breaking News

 वृक्षारोपण व अनाथाश्रमाला सीसीटीव्ही व भेटवस्तू प्रदान, अनिल ठाकूरवार यांची जयंती साजरी 

Advertisements
 वृक्षारोपण व अनाथाश्रमाला सीसीटीव्ही व भेटवस्तू प्रदान, अनिल ठाकूरवार यांची जयंती साजरी
राजुरा, वार्ताहर  –
             शेतकरी संघटनेचे नेते, राजुरा नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष स्व. अनिल ठाकूरवार यांची जयंती स्वामी विवेकानंद अनाथाश्रम येथे ठाकुरवार परिवारा कडून कार्यक्रमाचे आयोजन करून साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक माजी आमदार अँड. वामनराव चटप, संस्थाध्यक्ष डॉ. भूपाळ पिंपळशेंडे, सचिव अँड. मुरलीधर देवाळकर, संचालक दिनकर डोहे, सुभाष रामगिरवार, डॉ.रेड्डीवार, मारोती येरने, दिलीप डेरकर, भाऊराव बोबडे, मारोती गव्हाणे इत्यादी उपस्थित होते.
              या कार्यक्रमात श्रीमती रजनी अनिल ठाकूरवार यांनी विवेकानंद अनाथाश्रमाला सीसीटीव्ही कॅमेरे भेट म्हणुन दिले. सोबतच विद्यार्थ्यांंना शालोपयोगी वस्तू वितरित केल्या. या कार्यक्रमात अनिल ठाकूरवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मान्यवरांच्या हस्ते पाच झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी देण्यात आली.
              कार्यक्रमाचे संचालन भाऊराव बोबडे व आभार प्रदर्शन मारोती गव्हाने यांनी केले. या कार्यक्रमात श्रीमती रजनी ठाकुरवार यांच्यासह नातेवाईक व परिवारातील मित्र मंडळी उपस्थित होती.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *