आदिवासी भागातील शाळा अत्याधुनिक करणार.
राज्यमंत्री “प्राजक्त तनपुरे”
कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
शिक्षण मानवाची मूलभूत गरज असून यामुळेच मानवाचा सर्वांगीण विकास होतो. यादृष्टीने आदिवासी भागातील शाळा सोयीसुविधांनी अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत उच्च व तंत्रशिक्षण, नगरविकास,आदिवासी कल्याण,मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.ते कोरपना येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते.ते पुढे म्हणाले की,राज्यातील नागरिकांना स्वस्त वीज मिळावी.यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे.यादृष्टीने सौर उर्जेवर आधारीत ऊर्जा निर्मितीला वाव दिला जात असून शासनातर्फे विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे.लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करत कुसुंबी येथील आदिवासी बांधवांच्या प्रश्नांसंदर्भात मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेऊन न्याय देण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान कोरपनाकडे जाताना तनपुरे यांनी गडचांदूर येथील राकाँ जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली असता कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.गडचांदूर आणि कोरपना येथे तालुक्यातील विविध पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला.याप्रसंगी अर्जुनी मोरगावचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,चंद्रपूर महानगरपालिका नगरसेवक संजय वैद्य,नितीन भटारकर,जगदीश जुनघरी,राजूरा विधानसभा अध्यक्ष अरूण निमजे,सैय्यद आबीद अली,बेबीताई उईके,गडचांदूर न.प. उपाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष शरद जोगी, कोरपना न.प.नगरसेवक सुहेल अली,प्रवीण मेश्राम,प्रवीण काकडे,सूनील अर्किलवार,मयुर एकरे,वैभव गोरे,करण सिंग,रोहन कुळसंगे, प्रफुल मेश्राम,आकाश वराठे,मुनीर शेख, निखील एकरे,सरला मेश्राम,साजीद शेख,बंडू चौधरी इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.