विश्व भारत ऑनलाईन :
मागील अडीच वर्षांपासून बंद असलेली भुसावळ – वर्धा पॅसेंजर पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेेवेत रुजू हाेणार आहे. ही रेल्वे मध्यमवर्गीय प्रवाशांना आर्थिक दृष्ट्या लाभदायक ठरणार आहे.
मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी ही रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पॅसेंजरद्वारे विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेली संत नगरी शेगाव येथे मोठया संख्येत प्रवासी ये-जा करत असतात. आता ही पॅसेंजर सुरू होत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पॅसेंजर असल्यामुळे प्रत्येक लहान स्थानकांवर ती थांबते. सर्वसामान्य प्रवाशांसाठी तिचे तिकीट स्वस्त व सोयीस्कर असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ कार्यालयाद्वारे देण्यात आली.
वेळापत्रक असे…
पॅसेंजर रेल्वे दररोज धावणार आहे. एकूण १० जनरल सिटींग (जनरल सिटींग) व दोन एसएलआर (सिटींग कम लगेज रक) असे एकुण १२ कोच राहतील.सूचनेनुसार भुसावळ- वर्धा – भुसावळ ( 11121) ही ट्रेन भुसावळ येथून दुपारी ०२.३० वाजता सुटेल व शेगाव रेल्वे स्थानकावर दुपारी ०४.४५ वाजता पोहोचेल. ही पॅसेंजर वर्धा रेल्वेस्थानकावर रात्री ०८.२६ वाजता पोहोचेल. तसेच वर्धा-भुसावळ-वर्धा(11122) पॅसेंजर वर्धा रेल्वे स्थानकावरून मध्यरात्री १२.०५ वाजता सुटेल. शेगाव रेल्वे स्थानकावर ही ट्रेन पहाटे ०४. ४७ वाजता पोहचेल आणि शेवटी भुसावळ रेल्वे स्थानकावर रात्री ०७.२५ वाजता पोहोचेल.