20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार, कोणत्या जिल्ह्यात अलर्ट… वाचा

विश्व भारत ऑनलाईन :

पुणे, सातारा,कोल्हापूर, कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी या भागांसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत 20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर, उत्तर,मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. शुक्रवारी पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाने अगदी सकाळपासूनच हजेरी लावली.

संततधार पावसामुळे कमाल आणि किमान तापमान कमी झाल्याने वातावरणात थंडी जाणवत होती. 20 सप्टेंबरपर्यंत विदर्भात विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळणार आहे. पुणे, सातारा या भागात आगामी दोन दिवस घाटमाथ्यावर मुसळधार, कोकणातील पालघर, रायगड या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पुढील दोन दिवस बरसणार आहे.आज पालघर आणि रायगड जिल्ह्यांत ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर यलो अलर्ट राज्यातील अन्य जिल्ह्यांत दिला आहे.

यलो अलर्ट आणि जिल्हे

ठाणे 19, 20 सप्टेंबर, रत्नागिरी 17, पुणे घाटमाथा 19,20, जळगाव 18 ते 20, नगर 18 ते 20, सोलापूर 20, औरंगाबाद 18, 19, जालना 18, 19, परभणी 18 ते 20, बीड 20, हिंगोली 18 ते 20, नांदेड 18 ते 20, अकोला 17 ते 20, बुलडाणा 17 ते 20, भंडारा 17 ते 20, चंद्रपूर 17 ते 20, गोंदिया 17 ते 20 तारखेपर्यंत असणार आहे.

About विश्व भारत

Check Also

राज्यातील अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड

महिनाभर प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीचे मतदान आज, बुधवारी होत असून, त्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार …

अनिल देशमुख यांच्यावर कोणी केला हल्ला? मोठा दावा

विधानसभेचा प्रचार थंडावल्यानंतर काल नागपूरमध्ये राज्याच्ये माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *