विश्व भारत ऑनलाईन :
आफ्रिकन देश नामिबियातून आज शनिवारी आठ विदेशी चित्ते तब्बल 70 वर्षांनंतर भारतात पोहोचले आहेत. एक विशेष विमान मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये दाखल झाले. येथून हेलिकॉप्टरद्वारे चित्त्यांना मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नेण्यात येणार आहे.
परदेशी चित्ते श्योपूरला पोहोचले
नामिबियाचे चित्ते मध्य प्रदेशातील श्योपूर येथे पोहोचले आहेत. हेलिकॉप्टर चित्तांसह ग्वाल्हेरहून श्योपूरला पोहोचले आहे. काही वेळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडतील. 70 वर्षांनंतर भारतात पुन्हा चित्ते दाखल झाले आहेत.
वय, मादी आणि नर
8 चित्त्यांमध्ये 5 मादी आणि 3 नर चित्ते आहेत. तर 3 नर चित्यांमध्ये 2 सख्खे भाऊ आहेत.तर चित्ता ब्रदर्सचं वय साडे पाच वर्ष आहे. तिसऱ्या नर चित्याचं वय साडे चार वर्ष आहे. तसेच 5 मादी चित्त्यांचं वय 2 वर्षे ते 5 वर्षांपर्यंत आहे. या चित्यांचं आयुष्य जास्तीत जास्त 12 वर्षे असते, अशी माहिती देण्यात आली आहे.