विश्व भारत ऑनलाईन :
बहिरम येथील पंचशील आश्रमशाळेतील ३३ मुलींना शुक्रवारी रात्री उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकारमुळे एकच खळबळ उडाली. एका मुलीला अमरावती येथे पुढील उपचारासाठी हलविले. तर ८ मुलींना घरी सोडण्यात आले आहे. इतर सर्व मुलींची प्रकृती स्थिर असून डॉक्टर मुलींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
आश्रम शाळेतील ३ ते ४ मुलींना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर आणखी काही मुलींना याबाबत विचारण्यात आले. त्यावेळी जवळपास ३३ मुलींनी आपल्याही पोटदुखीचा त्रास होत असल्याचे सांगितले. त्यामुळे शाळा प्रशासनाने सर्वांना तपासणीसाठी अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. यापैकी केवळ तीन चार मुलींना पोटदुखी, उलटीचा त्रास जाणवत होता. तर काहींना सर्दी खोकल्याचा त्रास होता. सध्या या सर्व मुलींची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांची टीम लक्ष ठेऊन आहे.