Breaking News

राज ठाकरे रविवारपासून नागपूर, चंद्रपूर, अमरावती दौऱ्यावर

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे उद्या रविवार 18 सप्टेंबरपासून विदर्भाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आगमन होणार आहे. विदर्भ एक्सप्रेसने मुंबईहुन रवाना झाले असून, उद्या सकाळी 8.30 वाजता त्यांचे नागपुरातील मुख्य रेल्वेस्थानकावर आगमन होईल. त्यानंतर रविभवन येथे कार्यकर्त्यांच्या बैठका घेतील.

Advertisements

15 वर्षांनंतर विदर्भात

ठाकरे हे सुमारे 15 वर्षांनंतर विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर 2005 मध्ये राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. त्या नंतर मनसेची स्थापना झाल्यानंतर जून 2006 मध्ये दौरा केला होता. 2019 मध्ये वणीला प्रचार दौऱ्यावर आले होते. तर 2014 मध्येही दौरा केला होता. मात्र त्या नंतर प्रथमच विदर्भ दौऱ्यावर येत आहे. राज ठाकरे यांचा दौरा नव्या राजकीय समीकरणाची ही नांदी असल्याचेही बोलले जात आहे. विदर्भातील मनसे संघटन मजबूत करण्यावर भर देण्यासोबतच आघाडीला धक्का देण्याची तयारी ठाकरे यांनी केल्याचे सांगितले जाते.

चंद्रपूर, अमरावती दौरा

राज ठाकरे नागपुरला आल्यानंतर चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांचा दौरा ते करणार आहेत. या दौऱ्यात सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन ते चर्चा करतील. आगामी महापालिकांच्या निवडणुकांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत पक्षाचा विचार सुरू आहे. इतर पक्षाचे लोक मनसेमध्ये प्रवेश करतील, त्यादृष्टीनेही तयारी सुरू झालेली आहे. या दौऱ्यासाठी मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, राज्य उपाध्यक्ष आनंद एंबडवार, अमरावती जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील चार दिवस आधी नागपुरात तळ ठोकून आहेत.

सेनेच्या मतांवर डोळा

कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेची ताकद वाढणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. शिवसेनेच्या मतांमध्ये विभाजन व्हावे, याकरिता भाजपचीही गुप्त तयारी सुरू आहे. शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या भागांत मनसेचे उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दोनचार टक्के मतांचे विभाजन झाले तरी भाजप-मनसे युतीचा उद्देश साध्य होणार आहे. नवे राजकीय समीकरण तयार झाल्यास नागपूर महापालिकेत मनसेचे खाते पुन्हा उघडू शकते. याचा फायदा मनसेला चंद्रपूर आणि अमरावती महानगरपालिकांमध्येही होऊ शकतो.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

महाराष्ट्रात ५ जुलैपर्यंत आचारसहिंता कायम : नागपूरसह विदर्भात असणार की नसणार?

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील चार जागांसाठी आता २६ जूनला निवडणूक होणार आहे. या …

डामरीकरण सडक निर्माण मे भारी अनियमितता और भ्रष्टाचार की खुली कलई? जनप्रतिनिधि मौन

डामरीकरण सडक निर्माण मे भारी अनियमितता और भ्रष्टाचार की खुली कलई? जनप्रतिनिधि मौन टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *