Breaking News

‘पीएम किसान सन्मान’चा हप्ता लवकरच… वाचा वृत्त सविस्तर

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी किसान सन्मान योजना सुरू केली आहे. योजनेनूसार आतापर्यंत ११ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून, सप्टेंबर अखेरपर्यंत १२ वा हप्ता जमा करण्यात येईल, अशी माहिती आहे.

Advertisements

दिवाळीच्या तोंडावर

या योजनेचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा डिसेंबर ते मार्च दरम्यान असतो. ऑक्टोबर महिन्यात दिवाळी असल्याने शेतकऱ्यांचा सण गोड करण्याच्या उद्देशाने सप्टेंबर महिन्यातच सरकारकडून १२ वा हप्ता जमा केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ई-केव्हायसी महत्वाचे

१२ वा हप्ता जमा करण्यापूर्वी शेतकर्यांना ई-केव्हायसी करणे गरजेचे आहे. आतापर्यंत ८०% शेतकऱ्यांनी त्यांचे केव्हायसी पुर्ण केले आहे. अजूनही काही शेतकऱ्यांना ई-केव्हायसी करणे बाकी आहे.ज्या शेतकर्यांनी आतापर्यंत ई-केव्हायसी केले नाही त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा करते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. दरम्यान या योजनेचा ११ वा हप्ता जून महिन्यात शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

YouTube Social Media Portal Leads the Way in News Dissemination Services

YouTube Social Media Portal Leads the Way in News Dissemination Services YouTube Social Media Portal …

राजधानी दिल्ली में बिना कनेक्शन के मिलेगा LPG सिलेंडर

राजधानी दिल्ली में बिना कनेक्शन के मिलेगा LPG सिलेंडर   टेकचंद्र शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *