विश्व भारत ऑनलाईन :
अमरावती जिल्हा स्री रुग्णालयात बेबी केअर सेंटरला शॉर्टसर्किटमुळे आज रविवारी अचानक आग लागली. अग्निशमन दलाने दोन बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली. बालकांना सुरक्षितपणे हलवण्यात आले. धुरामुळे काही बालकांची प्रकृती गंभीर बनली आहे.
त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दोन मुलांना डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी लहान बाळांची तातडीने काळजी घेऊन त्यांचे प्राण वाचवले.