विश्व भारत ऑनलाईन :
पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस अध्यक्ष निवडीवरून गांधी घराण्याला इशारा दिलाय. चव्हाण यांनी असं म्हटलं आहे की जो नवा काँग्रेस अध्यक्ष निवडला जाईल त्याला काम करू दिलं पाहिजे.
राहुल गांधी यांनी जबाबदारीशिवाय ढवळाढवळ केली तर आम्ही प्रश्न विचारू असा इशारा दिला आहे. गांधी कुटुंबालाच त्यांनी हा इशारा दिला आहे. काँग्रेस पक्षात इतक्या वर्षांनी या निवडणुका घेतल्या जात आहेत. यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल यासाठीच आम्हीही या निवडणुकांसाठी आग्रही होतो. पुढे काय घडेल हे आत्ता सांगणं कठीण आहे. अध्यक्ष निवडून आल्यानंतर त्यामध्ये बाहेरून ढवळाढवळ केली तर आम्ही प्रश्न उपस्थित करू. आत्ताच आम्ही असंच घडेल असं गृहित धरून चाललो नाही असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.