Breaking News

भाजपमध्ये शिक्षक आमदारकीसाठी नागपुरातून कोणती नावे चर्चेत?

विश्व भारत ऑनलाईन :
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. कधी काळी नितीन गडकरी यांनी नेतृत्व केलेला पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड होता. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने अभिजित वंजारी यांना उभे करुन भाजपच्या गडावर कब्जा केला होता.

आता शिक्षक आमदार निवडणुकीची घंटी वाजली आहे. त्यासाठी सुमारे अर्धा डझन इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवार निवडताना भाजपची मोठी डोकेदुखी वाढणार आहे. यामध्ये बंडाची शक्यता लक्षात घेऊन शिक्षक मतदारसंघाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपने सावध भूमिका घेतली आहे.

भाजपतर्फे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. माजी आमदार अनिल सोले यांच्यावर पदवीधरमध्ये अन्याय झाल्याने त्याची परतफेड शिक्षक मतदारसंघाच्या माध्यमातून करावी, अशी जोरदार मागणी आहे. दक्षिण नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. आमदार नागोराव गाणार यांचे नेहमीप्रमाणे वेट अँड वॉच सुरु आहे. कुठल्याच नावावर एकमत होणार नाही, असा त्यांच्या कट्टर समर्थकांचा दावा आहे. दुसरीकडे नेत्यांच्याच मागे किती दिवस फिरणार असे सांगून राजू कनाटे यांनी आपण उमेदवारी दाखल करणार असल्याचे सर्वांनाच स्पष्टपणे सांगितले. त्यांनी आपला एक प्रचार दौरा आटोपलाही आहे.

नेत्यांकडे इच्छुकांची ‘फिल्डिंग’

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी आमदार अनिल सोले यांनाही त्यांनी आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट पूर्वसूचना दिली आहे. माजी महापौर आणि विद्यापीठाच्या राजकारणात सध्या प्रचंड सक्रिय असलेल्या कल्पना पांडे यासुद्धा मोर्चेबांधणी करत आहेत. योगेश बन यांचा नेहमीप्रमाणे दावा अद्यापही कायमच आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घेतली असल्याने त्यांच्या मर्जीतील उमेदवार महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे स्पर्धेत असलेली अनेक बडी नावे कापले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता राज्यात राजकारणात गरजेपेक्षा जास्त लक्ष घालायचे नाही, असे ठरवले आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांची अडचण होऊ शकते.

पुनरावृत्ती टाळण्यासाठी सावध

पदवीधरची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता भाजप सावध भूमिकेत आहे. भाजप समर्थक आमदार नागोराव गाणार दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहे. आपसातील मतभेदांमुळे हा मतदारसंघसुद्धा हातून जाऊ नये, याची पुरेपूर काळजी भाजपला घ्यावी लागणार आहे. त्यामुळे उमेदवार देताना गटबाजी टाळण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे आहे.

About विश्व भारत

Check Also

भाजपकडून तेली समाजाचा अपेक्षाभंग : तिघांनाच तिकीट

तेली समाज हा माझाच आहे. तो सदाही माझा पाठीराखा म्हणून मी पण तेली समाजाचा पाठीराखा. …

प्रगतिशील और समृद्धशाली हैं कुर्मी क्षत्रीय समाज : CM विष्णुदेव साय का बयान

प्रगतिशील और समृद्धशाली हैं कुर्मी क्षत्रीय समाज : CM श्री विष्णुदेव साय का बयान टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *