Breaking News

आवडीची भाजी न केल्याने मुलाने आईला संपविले

विश्व भारत ऑनलाईन :
आईने केलेली दुधीची भाजी मुलाला अजिबात आवडली नाही. त्यामुळे त्याने आईला दुसरी भाजी करायला सांगितली, मात्र आईने नकार दिला. त्यावरुन संतापलेल्या मुलाने आधी आपल्या वृद्ध आईला काठीने मारहाण केली.त्याचे वडील आईला सोडवण्यासाठी आले असता त्यांनीही मारहाण केली. पण, या क्रूर मुलाचे मन भरले नाही, तेव्हा त्याने जन्मदात्या आईला पहिल्या मजल्यावरुन ढकलून दिले. या घटनेत वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.

मुलाने आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना लुधियानाच्या अशोक नगर भागातील आहे. मृत चरणजीत कौर (वय ६५) यांनी सोमवारी दुधीची भाजी केली होती, जी तिचा लहान मुलगा सुरिंदर सिंग याला आवडत नव्हती. आरोपी सुरिंदर सिंगने आईला दुसरी भाजी बनवण्यास सांगितले, मात्र चरणजीत कौर यांनी नकार दिला. यामध्ये आरोपीने रागाच्या भरात आईला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर सुरिंदरने स्वतःच्या आईला पहिल्या मजल्यावरून ढकलले, ज्यात ती गंभीर जखमी झाल्याचा आरोप आहे. चरणजीत कौर यांचा मंगळवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

About विश्व भारत

Check Also

पत्नी की हैवानियत : नौ बच्चों की मां ने करवा दी पति की हत्या

पत्नी की हैवानियत : नौ बच्चों की मां ने करवा दी पति की हत्या टेकचंद्र …

प्यार मे पागल भांजे संग होटल में सुहागरात : पोल खुलते ही खाया जहर

प्यार मे पागल भांजे संग होटल में सुहागरात : पोल खुलते ही खाया जहर टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *