Breaking News

काय सांगता, चोरट्यांनी चोरली डाळिंब बाग

विश्व भारत ऑनलाईन :
सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील बोंबेवाडी येथे चोरट्यांनी एका डाळिंब बागेवर डल्ला मारल्याची घटना उजेडात आली आहे. चार लाख किमतीचे तब्बल तीन टन डाळिंब रातो-रात चोरून नेले आहेत. आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये डाळिंब चोरीची फिर्याद दाखल झाली आहे.

सांगली आटपाडी तालुक्यातील बोंबेवाडी या ठिकाणी यशवंत मेटकरी या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेमध्ये डाळिंबाची चोरी झाल्याची घटना घडली आहे. विक्रीसाठी आलेले डाळिंब रातोरात चोरून नेले आहेत.

सुमारे पाचशे झाडांवरील डाळिंब चोरट्यांनी तोडून लंपास केले आहेत. तब्बल तीन टन आणि चार लाख किमतीचे डाळिंब असल्याचं यशवंत मेटकरी यांनी सांगितला असून काही दिवसांपूर्वीच या डाळिंबाची विक्रीचा सौदा झाला होता, 148 रुपये इतका दर देखील मिटकरी यांना एका व्यापाऱ्याने फायनल केला होता.

शिवाय काही दिवसातच या डाळिंबाची तोडणी होणार होती. मात्र, त्याआधीच अद्याप चोरट्यांनी मिटकरी यांच्या डाळिंब बागेवर डल्ला मारून हे डाळिंबाची चोरी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये शेतकरी यशवंत मेटकरी यांनी फिर्याद दाखल केली, असून या डाळिंब चोरीच्या घटनेमुळे आटपाडी तालुक्यातल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण आहे.

About विश्व भारत

Check Also

फळपीक विमा योजनेत बोगस अर्ज : काय आहे प्रकरण?

लागवड न करताच सुमारे साडेदहा हजार शेतकऱ्यांनी फळपिक विम्यासाठी अर्ज केल्यामुळे कृषी विभागाची झोप उडाली …

नागपुरात पावसाचा अंदाज!कांदा, धान, मका

राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून थंडी कमी झाली आहे. 6 डिसेंबर पर्यंत राज्यातील विविध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *