Breaking News

सावधान! शॅम्पूत आढळला कॅन्सरचा घटक ; बाजारातून परत मागवली उत्पादने

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

डव्ह शॅम्पूमध्ये बेंझिन हे घातक रसायन सापडले आहे. शॅम्पूमधील या घटकामुळे कॅन्सर होण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे हिंदुस्थान युनिलिव्हरने अमेरिकी बाजारातून डव्ह हे एरोसोल ड्राय शॅम्पू परत मागवले. यापूर्वी जॉन्सन अँड जॉन्सन या अमेरिकी कंपनीलाही अशाप्रकराचा फटका बसला होता.

Advertisements

हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीची उत्पादने जगभर मोठ्या प्रमाणात वापरली जातात. कंपनीने परत मागवलेल्या वस्तूंमध्ये Dove शॅम्पूसोबत Nexxus, Suave, Tresemmé and Rockaholic and Bed Head dry shampoo maker Tigi, यांसारख्याही गृहउपयोगी वस्तूंचाही यामध्ये समावेश असल्याचे ब्लूमबर्गने अन्न आणि औषध प्रशासनाच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या नोटिसचा हवाला देत हे वृत्त दिले आहे.

बेंझिन हे मानवी शरिरासाठी घातक आहे. बेंझिन हा घटक मानवी नाक, तोंड आणि त्वचेच्या माध्यमातून शरिरात प्रवेश करतात. त्यामुळे Dove या जगप्रसिद्ध शॅम्पूमध्ये बेंझिनसारखा कर्करोगाला आमंत्रण देणारा घटक असल्याकारणाने युनिलिव्हरने Dove शाम्पूबरोबरच अनेक उत्पादने अमेरिकेतील बाजारातून मागे घेतली आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

जानिए मनचाही संतान प्राप्ति के लिए नैसर्गिक नियमों का परिपालन और उपाय!

जानिए मनचाही संतान प्राप्ति के लिए नैसर्गिक नियमों का परिपालन और उपाय! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

‘हार्ट अटॅक’ येण्यापूर्वीची लक्षणे कोणती?

महिन्याभरापूर्वी समजतात लक्षणे एक महिना आधी हार्ट अटॅक येणारपूर्वी थकवा येणे, झोप कमी लागणे, थकवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *