राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून थंडी कमी झाली आहे. 6 डिसेंबर पर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे. कांदा, मका उत्पादक शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या शेतमालाला चांगले झाकून ठेवावे.
हिंगोली, नांदेड, परभणी, वाशिम, बीड, धाराशिव, लातूर तसेच विदर्भातील यवतमाळ, नागपूर, बुलढाणा, जालना व पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, नगर आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, निफाड, मालेगाव, जळगाव या भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे.
8 डिसेंबर पासून राज्यातील हवामान स्वच्छ होऊन पुन्हा थंडीला सुरूवात होईल.