Breaking News

पोलीस भरतीसाठी सराव करताना हृदयविकाराने तरुणाचा मृत्यू

वसईत पोलीस भरतीसाठी सराव करताना एका 22 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रतीक महेंद्र मेहेर असे या तरुणाचे नाव आहे. तो मूळ विरारच्या अर्नाळा परिसरात राहणारा आहे. पोलीस भरतीचा सराव करताना प्रतीकला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याला मृत्यूने कवटाळलं. वसई पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर पोलीस शिपाई भरती होणार आहे. यासाठी अर्ज भरण्याचा कालावधी सुरु असून इच्छुक तरुण वर्ग यासाठी जोमाने सर्व तयारी करताना दिसत आहे. वसईतीलही अनेक तरुण यासाठी प्रयत्न करत असून त्यांचा सराव सुरु आहे.

यापैकीच एक मूळचा अर्नाळा इथल्या रानगाव इथं राहणाऱ्या प्रतीक महेंद्र मेहेर याने देखील यासाठी सराव सुरु केला होता. लहानपणापासून पोलिसात भरतीचे होण्याचे स्वप्न पाहत असलेल्या या तरुणासाठी राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीमुळे एक संधी चालून आली होती. अर्ज भरल्यानंतर त्याने भरतीपूर्व सराव सुरु केला होता

About विश्व भारत

Check Also

तरुणांना प्रशासनासोबत कामाची संधी : ६० हजार रुपये वेतन

राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत …

12 वीं पास युवाओं के लिए 15 हजार पदों पर निकली भर्ती

12 वीं पास युवाओं के लिए 15 हजार पदों पर निकली भर्ती टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *