Breaking News

हेडफोनमुळे कानाचा कॅन्सर : मोठ्या आवाजात गाणी ऐकताय, बहिरेपणाचाही धोका

Advertisements

संगीत थिरकायाला लावते. संगीत मनाला स्पर्श करते. मात्र, संगीत ऐकताना तुमच्या कानालाही त्रास होऊ शकतो. सतत मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याची ज्यांना सवय आहे, त्यांच्यासाठी धक्कादायक माहिती आहे. मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने जगभरातील १२-३४ या वयोगटातील तब्बल १३५ कोटी लोकांना बहिरेपणाचा येण्याची शक्यता आहे. दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक असलेल्या मोबाईल फोनचे डिवाईस हेडफोन्स आणि ईयरबड्स तुमच्या बहिरेपणाच्या समस्येला कारणीभूत ठरू शकतात.

Advertisements

तसेच डीजे पार्टी आणि मनोरंजनाच्या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या स्पिकरच्या मोठ्या आवाजाच्या संपर्कात असल्याने तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर असेलेल्या अधिकाऱ्यांनी स्टडी केला आहे. सुरक्षित आवाजात ऐकण्यासाठी सरकारकडून धोरणे आखण्याची आवश्यकता आहे, असं या अधिकाऱ्यांनी या स्टडीच्या माध्यमातून आवाहन केलं आहे.

Advertisements

आताच्या युगात मोबाईल फोन हातात घेतल्याशिवाय लोकांची सकाळ होत नाही, असं म्हणतात. ते सत्यच आहे. कारण रस्त्यावरून जाताना, गाडी चालवताना, ट्रेनच्या प्रवासात आणि विशेषत: घरी असल्यावर बहुतांश लोक मनोरंजनासाठी मोबाईल फोनवर गाणी ऐकतात. हेडफोन्स कानाला लावून मोठ्या आवाजामुळं लोकांना कानाचा कर्करोग झाल्याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. त्यामुळे सतत गाणी ऐकण्याची सवय तुम्हाला असेल, तर या गंभीर समेस्येपासून तुम्ही सावध झालं पाहिजे. डीजे पार्टीमध्ये मोठ्या आवाजाच्या संपर्कात येण्यापासून सावध राहिलं पाहिजे.

काही स्मार्टफोनमध्ये साउंड कंट्रोलिंग सिस्टीम असते. यावरून त्या आवाजाची क्षमता कळते. तसेच आवाज प्रमाणापेक्षा जास्त आहे की नाही, याबाबतही माहिती मिळते. तुम्हाला बहिरेपणासारख्या गंभीर समस्येचं समूळ उच्चाटन करायचं असेल, तर ऑटोमॅटिक व्हॉल्यूम डिवाइसचाही वापर करू शकता. त्यामुळे कानात ऐकू येणारा आवाज कमी होईल. ज्यांना गाणी ऐकण्याची खूप आवड आहे, त्यांनी कमी आवाजात गाणी ऐकल्यास तसेच हेडफोन्स आणि ईयरबड्सचा अनावश्यक वापर टाळल्यास या समस्येवर मात करता येऊ शकते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

उच्चतम विटामिन की खान है आयुर्वेदिक अश्वगंधा? तनाव थकान ब्रेन पावर के लिए है संजीवनी

उच्चतम विटामिन की खान है आयुर्वेदिक अश्वगंधा? तनाव थकान ब्रेन पावर के लिए है संजीवनी …

ग्रहस्थ जीवन में अर्धांगिनी को सुखमय रखने के लिए पूरी ईमानदारी से हाथी की तरह करें काम

ग्रहस्थ जीवन में अर्धांगिनी को सुखमय रखने के लिए पूरी ईमानदारी से हाथी की तरह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *