Breaking News

फडणवीसांविरोधात फेसबुक पोस्ट : पुण्यात तरुणाविरोधात गुन्हा

Advertisements

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

कलम १५३ अंतर्गत हा गुन्हा दखल करण्यात आला आहे. अनिल हरपळे असे या व्यक्तीचे नाव असून तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisements

उद्धव ठाकरे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची साथ सोडून महविकास आघाडी स्थापन केली. ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयाची सल अजूनही भाजपच्या मनात कायम आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच ट्वीट करत उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटलं होतं की, ‘तुमच्यासोबत २४ तास असणारा, सत्ता भोगणारा व्यक्ती खंजीर खुपसतो. तुम्ही माझ्याशी बेईनामी कराल तर मी बदला नक्कीच घेईन. बेईमानाला जागा दाखवावी लागते दाखवली. होय मी बदला घेतला.’ फडणवीस यांच्या या ट्वीटला अनिल हरपळे यांनी उत्तर दिले होते.

देवेंद्र फडणवीसांच्या ट्वीटला उत्तर देताना अनिल हरपळे यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. त्यामुळे संतापलेल्या हवेली तालुक्यातील स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

राह चलती लड़कियों के छेडने वाले सलमान की पुलिस थाने में हुई जमकर धुलाई

राह चलती लड़कियों के छेडने वाले सलमान की पुलिस थाने में हुई जमकर धुलाई   …

तहसीलदार, कोतवाल लाच घेताना सापडले : आणखी किती महसूल अधिकारी रडारवर? वाचा

रास्त दुकानदारावर कारवाई व परवानाही रद्द न करण्यासाठी केज तहसील कार्यालयातील तहसीलदार व कोतवाल २० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *