भारतीय क्रिकेटचा माजी खेळाडू विनोद कांबळी अडचणीत सापडला आहे. त्याच्या पत्नीने शुक्रवारी त्याच्याविरोधात मद्यधुंद स्थितीत मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कांबळीविरोधात भादंवि कलम 324 व 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
डोक्याला दुखापत
विनोद कांबळीने आपल्याला स्वयंपाकाच्या पॅनचे हँडल फेकून तिच्या डोक्याला दुखापत केल्याचा आरोप अँड्रिया कांबळीने केला आहे. त्याचवेळी हे प्रकरण सोडवले जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. माहितीनुसार, ही घटना शनिवारी दुपारी 1 ते 1.30 च्या सुमारास घडली. त्यावेळी कांबळी मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या वांद्रे स्थित फ्लॅटवर आला होता. तिथे त्यांनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली.घटना कांबळीच्या 12 वर्षाच्या मुलाने पाहिली. त्याने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण तो शांत झाला नाही. त्याने स्वयंपाकघरात धाव घेतील. तेथून पॅन आणून त्याच्या हँडलने अँड्रिया यांना मारहाण केली. वांद्रे पोलिसांनी सांगितले की, विनोद कांबळी यांची पत्नी अँड्रिया प्रथम भाभा रुग्णालयात गेली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचली.
बॅटने मारहाण
पत्नी अँड्रियाच्या तक्रारीनुसार, “कांबळीला शांत करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्याने विनाकारण मला व माझ्या मुलाशी शिवीगाळ केली. पॅनने मारहाण केल्यानंतर पुन्हा आम्हाला बॅटने मारहाण केली. मी त्याला रोखण्यात यशस्वी झाले. त्यानंतर मुलासह रुग्णालयात पोहोचले.”