Breaking News

न्यायमूर्ती गौरी यांची राजकीय पक्षाशी जवळीक : नियुक्तीला आव्हान, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

Advertisements

मद्रास हायकोर्टाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी निुयक्ती झालेल्या अ‍ॅड. लक्ष्मणा चंद्र व्हिक्टोरिया गौरी यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली. ही सुनावणी मंगळवारी अर्थात आज होईल. व्हिक्टोरिया गौरी यांचा भाजपशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Advertisements

गौरी यांना अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्याबाबत केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेकडे लक्ष वेधून ज्येष्ठ वकील राजू रामचंद्रन यांनी नव्याने उल्लेख केलेल्या या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठाने या प्रकरणात म्हटले आहे की,‘‘आम्ही या घडामोडीची दखल घेतली असून याचिकेची सुनावणी मंगळवारी सकाळी ठेवू शकतो. त्यासाठी खंडपीठही स्थापन केले जाऊ शकते, असे याचिका पुन्हा मांडण्यात आल्यानंतर खंडपीठाने सांगितले.

Advertisements

न्यायालयाच्या सोमवारच्या पहिल्या सत्रात या याचिकेची प्रथम दखल घेण्यात आली. त्यानंतर ११ वकिलांसह दोन न्यायिक अधिकाऱ्यांची अलाहाबाद, कर्नाटक आणि मद्रास उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याबाबतची केंद्र सरकारची अधिसूचना जाहीर झाली. यापैकी मद्रास उच्च न्यायालयातील वकील लक्ष्मणा चंद्र व्हिक्टोरिया गौरी यांच्या भाजपशी असलेल्या कथित संबंधांमुळे वाद उद्भवला आहे.

प्रकरण काय?

मद्रास उच्च न्यायालयातील वकील लक्ष्मणा चंद्र व्हिक्टोरिया गौरी यांची नियुक्ती मद्रास उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी करण्यात आली आहे. मदुराई खंडपीठापुढे केंद्र सरकारची बाजू मांडणाऱ्या गौरी यांची भाजपशी जवळीक असल्याचा आरोप करीत नियुक्तीला आव्हान दिले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *