Breaking News

गडचिरोलीत वीज कोसळून नववीतील विद्यार्थिनीचा मृत्यू

Advertisements

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील माल्लेर चक येथील एका विद्यार्थिनीचा शनिवारी वीज कोसळून मृत्यू झाला. स्वीटी बंडू सोमनकर (वय 15) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती कुनघाडा येथील विश्वशांती विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत होती.

Advertisements

घटना कशी घडली?

Advertisements

आज सकाळी शाळा सुटल्यानंतर स्वीटी सोमनकर ही सायकलने दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या माल्लेर चक या आपल्या गावाकडे जात होती. मात्र, त्याचवेळी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. स्वीटीच्या अंगावर वीज कोसळल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 पटना। …

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नासिक। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *