Breaking News

जळगावजवळ कुशीनगर एक्सप्रेसमध्ये लागली आग

Advertisements

कुशीनगर एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाच्या बॅगने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. मात्र तरूणाने प्रसंगावधान राखत बॅगेची आग विझवून लागलीच बाहेर फेकली. यामुळे मोठा अनर्थ टळला.

Advertisements

लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गोरखपुरच्या दिशेने जाणारी कुशीनगर एक्सप्रेस मधील इंजिनपासून तिसऱ्या क्रमांकाच्या जनरल बोगीमध्ये नांदगाव ते न्यायडोंगरी रेल्वे स्थानकादरम्यान एका प्रवाशी बॅगने अचानक पेट घेतला. सदरचा प्रकार प्रवाशांच्या लक्षात येताच डब्ब्यात एकच खळबळ उडाली. डब्ब्याच्या वरच्या बर्थवर असलेली बॅग खाली फेकली असता खाली बसलेल्या अजय अशोक मगरे (वय 23) या युवकाच्या बाजुला पडली. अजयने पायाने आग विझविण्याच्या प्रयत्न केला. यामुळे त्याच्या पायास किरकोळ इजा झाली. दरम्यान प्रवाशांनी चैन पुलिंग करुन गाडी थांबवली असता, अजय याने आग लागलेली बॅग गाडीतून बाहेर फेकली. सुदैवाने पुढील होणारा मोठा अनर्थ टळला.

Advertisements

जनरल बोगीमध्ये वरच्या बर्थवर ठेवलेल्या बॅगेतून अचानक आवाज येवुन स्पार्किंग झाली. क्षणार्धात बॅगेला आग लागली. बॅगेजवळ बसलेल्या एका प्रवाशाने बॅग खाली फेकली आणि अनर्थ टळला.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अयोध्‍येला जाण्‍यासाठी नागपूर?अमरावतीहून विशेष रेल्‍वे

उत्तर प्रदेशातील अयोध्‍या येथे २२ जानेवारीपासून प्रभू श्रीरामाचे मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. रामभक्‍तांना रामलल्‍लांचे …

नागपूरवरून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या होणार रद्द : प्रवास करण्याआधी वाचा

रेल्वे रुळ आणि सिग्नलिंगचे काम करण्यात येणार असल्याने पुढच्या काळात (१५ जानेवारीनंतर आणि फेब्रुवारी ) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *