Breaking News

महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नावे फसवणूक : पैसेही उकळले

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या पत्नी आणि लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांचं फेक ट्वीटर अकाऊंट तयार करण्यात आले.त्यानंतर या ट्वीटरच्या माध्यमातून पैसे उकळण्यात आले. हा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) या ठिकाणी उघडकीस आला आहे.

मागच्या काही वर्षांपासून ऑनलाईन फसवणूकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आपला ओटीपी, बँक अकाऊंट नंबर, क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा पासवर्ड कुणालाही सांगू नका, असे आवाहन बँकांकडून वारंवार करण्यात येते. तरीही असे प्रकार अनेकदा घडत आहेत. आता महिला आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांच्या नावाने बनावट ट्वीटर अकाऊंट उघडून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे.

नेमकी घटना काय ?

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका भामट्याने आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांच्या नावे बनावट ट्वीटर अकाऊंट उघडलं. त्यानंतर या बनावट ट्वीटर अकाऊंटवरुन या सायबर भामट्याने एका मुलीचे लिव्हर ट्रान्सप्लांट असून तिच्यावर उपचार सुरु आहेत अशी पोस्टही टाकली. या मुलीला उपचारांसाठी पैशांची गरज असल्याचंही या भामट्याने पोस्टमध्ये म्हटलं. उपचार सुरु असलेल्या मुलीसह एका महिलेचा फोटो आणि क्यूआर कोड ट्वीट करून व्हायरल केला. यानंतर हे अकाऊंट आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांचं असल्याचा विश्वास ठेवून देशभरातल्या अनेक आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेकांनी पैसे पाठवून मदत केली.

About विश्व भारत

Check Also

जिस्मफरोशी का अड्डा बनी रायपुर में रईसजादों की पॉश कॉलनीया

जिस्मफरोशी का अड्डा बनी रायपुर में रईसजादों की पॉश कॉलनीया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

महिला अधिकाऱ्यांचा खलबत्याने खून

शहराजवळ असलेल्या नवेगाव (मुरखळा) येथे भरदिवसा जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त अधिकारी महिलेची खलबत्त्याचा रॉड मारुन हत्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *