Breaking News

दिग्गज अभिनेत्याने मुंबई सोडली : म्हणाला…मुंबईत जीवन जगणे कठीण!

Advertisements

मराठीतील प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव हा त्याच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आला आहे. चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून आपल्या हसऱ्या चेहऱ्याने भरत जाधव नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. काही महिन्यांपूर्वी भरत कुटुंबीयांसह मुंबईबाहेर स्थायिक झाला. आता मुंबई सोडण्याचा निर्णय का त्याने घेतला याचे कारण सांगितले आहे.

Advertisements

सध्या कुठे?

Advertisements

काही महिन्यांपासून भरत त्याच्या कुटुंबीयांबरोबर कोल्हापूरला राहत आहे. त्याच्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत होता, त्याच्या नाटकाचे प्रयोगही हाऊसफुल होत होते. पण अशातच त्याने कोल्हापूरला स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे चाहते अवाक झाले. पण आता हा निर्णय घेण्यामागे काय विचार केला होता याचा खुलासा त्याने केला आहे.

काय म्हणाला भरत?

“मुंबई हे शहर आता बिझनेस हब झाले आहे. मुंबईच्या सध्या असलेल्या वेगाशी मी जुळवून घेणे मला कठीण वाटत आहे. त्या वेगाशी जुळवून घेण्यासाठी माझे वय सरत चालले आहे. परंतु आपल्याजवळ पैसे हवेत आणि आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवे म्हणून मी मुंबईबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईत काम करून मिळणारे पैसे आणि इथे होणारा खर्च हा सारखाच आहे. खर्च भागवण्यासाठी आपण पैसे कमावतो असे मला वाटू लागले.”

“या सगळ्यासाठी करावी लागणारी धावपळ आता माझ्या वयाला झेपणारी नाही हे मला जाणवले. त्यामुळे पैसे तर कमवायचे पण खर्च कमी करायचा, असे मी ठरवले. या सगळ्या आर्थिक बाबींचा विचार करून मी कोल्हापूरला स्थायिक होण्याचे ठरवले. आम्ही तिथे राहावे, अशी माझ्या आईची इच्छा होती म्हणून आम्ही तिथे राहायला गेलो.” आता भरत जाधवचे हे बोलणे चर्चेत आले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

हेमा मालिनी की संपत्ति बढ़ी, 129 करोड़ की मालकिन, पास हैं इतने करोड़ के गहने है।

हेमा मालिनी की संपत्ति बढ़ी, 129 करोड़ की मालकिन, पास हैं इतने करोड़ के गहने …

विनयभंगाच्या सीनआधी माधुरी दीक्षितने काय केले? वाचा

प्रसिद्ध अभिनेते रणजीत यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका केल्या. बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध खलनायक रणजीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *